सत्तेवर आल्यानंतर काळ्यापैशावर लगाम घालण्याचे आश्वासन पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून हद्दपार केल्याची घोषणा केली. मोदींनी ८ नोव्हेबरला भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठीची रणनिती अचानकपणे जाहिर केल्यानंतर मोदींना ऐकणाऱ्याला रात्री झोप लागणे मुश्किल झाले. तर ज्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी ही वार्ता समजली ते खडबडून जागे झाले. आपल्याजवळील नोटांचे काय करायचे? हा प्रश्न डोक्यात असणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या दिवशी बँक बंद असल्याचा आणखी एक धक्का बसला. त्यानंतर नोटा बदलण्यासाठी डाक कार्यालय आणि बँकामधील प्रक्रिया समजून घेऊन तिसऱ्या दिवशीपासून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह बँक आणि डाक कार्यालयात धाव घेतली. अचानकपणे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे देशातील विविध भागात बँक आणि डाक कार्यालयात ऐतिहासिक गर्दीचे स्वरुप प्राप्त झाले. परिणामी बँक, एटीएम आणि डाक कार्यालयात लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले. हे चित्र अद्यापही कायम आहे. काळ्या पैशाविरोधातील लढाईच्या पार्श्वभूमीवर काहींनी मोदींचे कौतुक केले. तर काहींनी रांगेतील मनस्ताप सांगत मोदींच्या निर्णयावर आक्षेपही नोंदविताना दिसत आहे. देशातील दैनंदिनी जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयासंदर्भात लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर संतप्त आणि विनोदांचा ससेमिरा सुरु आहे. ५० दिवसांच्या अल्टिमेटमध्ये जनतेला आणखी किती मनस्ताप सहन करावा लागणार आहे माहित नाही. पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशातून नागरिक देशातील काळ्यापैशाच्या स्ट्राइकवर आपापल्या परिने व्यक्त होत आहेत. काळ्यापैशाच्या पार्श्वभूमीवर ५०० आणि १००० नोटा चलनातून हद्दपार केल्यानंतर सोशल मीडियावर उमटलेल्या काही वेचक प्रतिक्रियावर एक नजर.. People talking in queue. What notes are there? Anything will do. Don't have money. They give only 100s That is okay as long as not 2000. — #DestroyTheAadhaar (@Vidyut) November 13, 2016 Whether it is a good decision or not, we don't know, but as of now it doesn't make any sense to us. For @narendramodi on #DeMonetisation pic.twitter.com/019w37ASwy — Abhishek Singh (@cwabhi) November 13, 2016 "Dur dur tak ek bhi branch ya atm khaali nahin hai." pic.twitter.com/XjPSTyIURa — The-Lying-Lama (@KyaUkhaadLega) November 12, 2016 Deewar in the time of #DeMonetisation pic.twitter.com/8CNaxW0tM1 — Nistula Hebbar (@nistula) November 13, 2016 When I told my family "Aap log new notes etc ki tension mat lo, is mahine ghar ka kharcha main chalaunga" pic.twitter.com/ThlrKmrVrJ — Abhishek Bachchan (@juniorbacchhan) November 12, 2016