व्यंकय्या नायडूंनी मनोज झा यांची फिरकी घेताच राज्यसभेत पिकला हशा

मनोज झा हे उपसभापतीपदासाठीचे विरोधकांनी दिलेले उमेदवार होते

राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा व्यंकय्या नायडू यांना खासदार मनोज झा यांची फिरकी घेण्याचा मोह आवरला नाही. निवडणूक प्रकिया पार पडल्यानंतर हरिवंश यांची बहुमताने निवड झाली. त्यानंतर मनोज झा हे अभिनंदनपर भाषण करण्यासाठी उभे राहिले. मात्र मनोज झा उभे राहताच व्यंकय्या नायडू यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामुळे एकच हशा पिकला.

नेमकं काय घडलं?

मनोज झा यांनी उभा राहू का सर? असा प्रश्न व्यंकय्या नायडूंना अभिनंदनपर भाषणासाठी विचारला होता. त्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांची फिरकी घेत आता उभे राहण्याची वेळ झाली आणि निवडणूकही झाली असं उत्तर दिलं. ज्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. निवडणूक प्रक्रियेनंतर झालेला हा किस्सा आजपर्यंत चर्चेत आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

मनोज झा हे उपसभापतीपदासाठीचे विरोधकांनी दिलेले उमेदवार होते. मात्र सोमवारी हरिवंश सिंह यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून पुन्हा एकदा एकमताने निवड झाली. त्यानंतर घडलेला हा किस्सा आत्तापर्यंत चर्चेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deputy chairman election rjd mp manoj jha venkaiah naidu says election done abn

ताज्या बातम्या