Rajsthan DCM Diya Kumari Sword Fight: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ आढळून आला. या व्हिडीओमध्ये साडी नेसून एक महिला तलवारबाजीचे कौशल्य दाखवत आहे असे दिसते. व्हिडिओतील महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिव्या (दिया) कुमारी असल्याचा दावा केला जात आहे. युजरने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, “ही महिला या पिढीतील आहे मग विचार करा इतिहासातील स्त्रिया आणखी किती कर्तबगार असतील, आपलं मूळ जपणे हे महत्त्वाचं आहे.” नेमकं या व्हायरल व्हिडिओमध्ये किती प्रमाणात तथ्य आहे हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Kiran Prasad व्हिडिओमधील महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी असल्याचे सांगत व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.

Union minister Piyush Goyal, BJP’s candidate for Mumbai North, interacts with supporters. (Express photo by Sankhadeep Banerjee)
पियूष गोयल यांच्या पहिल्याच प्रचारसभेत घुमला मतदारांचा सूर, “मुंबईचा आवाज आता दिल्लीत!”
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Vikas Mahant came in costume of Narendra Modi in meeting of Thane Lok Sabha Constituency
ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले पण, ते खरे नसल्याचे कळताच…

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही आमचा तपास, सोशल मीडिया वर शेअर करण्यात येत असलेले व्हिडीओ आणि त्यावरचे कमेंट्स वाचून केला. आम्हाला काही कमेंट वाचल्यावर असे लक्षात आले कि विडिओ मधील महिला, ह्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी नसून निकिताबा राठोड आहेत. बऱ्याच यूजर्सने त्यांचे अकाउंट देखील टॅग केले होते. आम्ही त्यानंतर निकिताबा यांचे इंस्टाग्राम प्रोफाइल तपासले आणि आम्हाला व्हायरल व्हिडिओ त्यावर आढळला.

आम्हाला त्यांचे YouTube चॅनल देखील सापडले, ज्यात त्यांनी तलवारबाजी प्रशिक्षक असल्याचे नमूद केले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही कॉलवर निकिताबा राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला माहिती दिली की हा व्हिडिओ गुजरातमधील अहमदाबाद येथील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा निमित्त नुकत्याच आयोजित केलेल्या रॅलीचा आहे. अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या निकिताबा गेल्या पाच वर्षांपासून तलवारबाजी करत आहेत.

हे ही वाचा << अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटी पाहून लोकांचा संताप? दानाची रक्कम ऐकून व्हाल थक्क, पण जेव्हा ‘ही’ खरी बाजू पाहाल..

निष्कर्ष: अहमदाबाद येथील तलवारबाजी प्रशिक्षक निकिताबा राठोडचा यांचा व्हिडिओ राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांचा असल्याचा दावा करत होत आहे व्हायरल. दावा खोटा आहे.