scorecardresearch

Premium

काश्मीरच्या विकासावर तरुणांनी गायले रॅप साँग; तुम्ही ऐकले का ‘बदलता काश्मीर’ गाणे? पाहा व्हायरल व्हिडीओ

रॅपर ‘हुमैरा जान’ आणि ‘एमसी रा’ यांचे ‘बदलता काश्मीर’ हे गाणे काश्मीरच्या खोऱ्यात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर आधारित आहे.

desh mera hindustan young rappers sing about new kashmir video goes viral
रॅपर 'हुमैरा जान' आणि 'एमसी रा' यांचे 'बदलता काश्मीर' हे गाणे काश्मीरच्या खोऱ्यात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर आधारित आहे. (फोटो सौजन्य – mygovindia )

काश्मीरमधील सकारात्मक बदलांबद्दल बोलणारे दोन उदयोन्मुख काश्मिरी कलाकारांचे एक रॅप गाणे इंटरनेटवर खूप लोकप्रिय होत आहे. रॅपर ‘हुमैरा जान’ आणि ‘एमसी रा’ यांचे ‘बदलता काश्मीर’ हे गाणे काश्मीरच्या खोऱ्यात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर आधारित आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

या गाण्यात ‘नवा काश्मीर’ या विषयावर भर देण्यात आला असून काश्मीरमध्ये होत असलेला विकास तरुणांनी शब्दात मांडला आहे. या गाण्यात काश्मीरमधील G20 बैठक, अमरनाथ यात्रा, पर्यटनातील सुधारणा आणि डिजिटल इंडियाच्या प्रगतीचाही उल्लेख आहे.

combative attitude of Sikh community
चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’
punjab bjp
शेतकरी आंदोलनावर पंजाबमधील भाजपा नेत्यांचे मौन का?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : पक्षविस्तार नव्हे पक्षबुडीचा संकेत
myanmar border
“म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालून सरकार आणखी एक बर्लिनची भिंत तयार करणार”; मणिपूर आदिवासी मंचाच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया

भारत सरकारनेही शेअर केले
भारत सरकारच्या वेब पोर्टलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॅप्शनसह शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘काश्मीरचे तरुण व्यक्त होत आहेत आणि तेही एका रॅप साँगद्वारे. नवीन काश्मीरचे प्रतिबिंब दाखवणारे हे गाणे ऐका. अनेक नामवंत व्यक्तींनी हे रॅप सोशल मीडियावर आपल्या कोट्ससह शेअर केले आहेत.

या सेलिब्रिटींनी कौतुक केले
माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने त्याच्या एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, ‘या काश्मिरी कलाकाराने प्रो-लेव्हल रॅपिंगचे प्रदर्शन केले, खूप चांगले.’ माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियानेही व्हिडिओ शेअर केला आणि ‘हा अप्रतिम रॅप पाहा.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desh mera hindustan young rappers sing about new kashmir video goes viral snk

First published on: 05-12-2023 at 16:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×