VIRAL VIDEO : अभी ना जाओ छोड कर पर…; बाप-लेकीचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

नेहमी आईच्या मायेचं कौतुक केलं जातं. बाप म्हणजे कठोर हृदयाचा असंच मानलं जातं. मात्र लेकीला सासरी पाठवताना हा बाप हळवा होतो. सध्या असाच बापलेकीचा एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

desi-bride-and-father-dance-viral
(Photo: Instagram/ wedding_choreographers)

नेहमी आईच्या मायेचं कौतुक केलं जातं. बाप म्हणजे कठोर हृदयाचा असंच मानलं जातं. मात्र कितीही कठोर बाप का असेना आपल्या मुलीच्या बाबतीत मात्र तो खूप कोमल होतो. एरवी आयुष्यात कितीही खाचखळगे आले, कितीही संकटं आली, खांद्यावर कितीही जबाबदाऱ्यांचं ओझं असलं तरी आपल्या चेहऱ्यावरील ताण बाजूला ठेवून, आपल्या अश्रूचा आवंढा गिळून, चेहऱ्यावर सतत हसू ठेवत एक कठोरातील कठोर पुरुष आपल्या लेकीला सासरी पाठवताना मात्र हळवा होतो. सध्या असाच बापलेकीचा एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडिओंमुळे आपल्याला हासू येतं, तर काही व्हिडिओ भावूक करणारे असतात. लग्न कार्यात असे अनेक भावूक क्षण आपण सर्वांनी अनुभवले आहेत. खरं तर नवरीच्या कुटुंबामध्ये असे क्षण सर्रास पाहायला मिळतात. लग्नाच्या दिवशी आपलं घर सोडून सासरी जात असताना नवरीच्या मनात अनेक विचारांचं वादळ घोंगावत असतं. या भावना नवरीच्या डोळ्यातून अश्रुंच्या रूपातून बाहेर पडत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात नवरीने आपल्या लग्नात वडिलांसोबत केलेला डान्स पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल.

‘वेडिंग कोरियोग्राफर्स’ नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये नववधू तिच्या वडिलांसोबत डान्स करताना दिसून येतेय. जी पोरगी आयुष्यभर बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. हा क्षण नवरीसाठी किती अवघड असतो हे दाखवून देणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक झाले नाहीत तर नवलंच.

आणखी वाचा : Weird Food Combination: Yuck! कांदा, बटाटा, मिरची नव्हे तर ओरिओ बिस्कीटची भजी; Viral Video पाहून लोक हैराण

आणखी वाचा : PHOTOS : ‘हे’ देशी जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल! यांच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर आहे सोल्यूशन

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नव्या नवरीने सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केलेल्या तिच्या वडिलांसोबत डान्स करताना दिसून येतेय. एकमेकांचा हात पकडून डान्स करताना दोघेही बाप-लेक भावूक होत आहेत. कदाचित याआधी इतका सुंदर क्षण कधी पाहिला नसेल. आपल्या वडिलांना सोडून दुसऱ्या घरी जावं लागणार याचा विचार करून नवरीच्या डोळ्यात देखील आश्रू दाटून आले. या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे की, तिचे वडील तिच्यावर प्रचंड प्रेम करत असल्याचं दिसत आहे. लेकीची सासरी पाठवणी करताना लग्नाच्या शेवटचे बापलेकीचे क्षण तसे आपण बरेच पाहिले आहेत. पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर प्रत्येकानं इमोशनल प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. यासोबतच प्लॅटफॉर्मवर व्हिडीओही शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना तुम्ही त्या अश्रूंना बांध घालू शकणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Desi bride and father dance to abhi na jao chhod kar in emotional viral video seen it yet prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या