Bride Dance Video : स्वतःच्याच लग्नात नवरीने केला इतका जबरदस्त डान्स की लोक जोरजोराने ओरडू लागले…

या व्हिडीओमधील नवरीबाईने स्वतःच्या लग्नात इतका जबरदस्त डान्स केलाय तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहाल. हा डान्स व्हिडीओ आतापर्यंत चार मिलियन लोकांनी पाहिला असून सुमारे तीन लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

bride-dance-video-viral
(Photo: Instagram/ wedding_choreographers)

लग्न म्हंटलं की हल्ली नवरा नवरीचा डान्स हा ठरलेला असतोच. आयुष्यातल्या या खास दिवशी नवरा आणि नवरी स्टेजवर डान्स परफॉर्म करत हा दिवस साजरा करण्याचा हल्ली ट्रेंडच आलाय. हल्लीच्या काळात नववधू सजून मंडपात नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी संपूर्ण वऱ्हाडी मंडळींसमोर आपलं प्रेम व्यक्त करणं पसंत करत असतात. सोशल मीडियाच्या जगात असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. परंतु काही व्हिडीओ शेअर होताच ते व्हायरल होऊ लागतात आणि बरेच दिवस पाहिले जातात. सध्या असाच एका नवरीच्या डान्सचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमधील नवरीबाईने स्वतःच्या लग्नात इतका जबरदस्त डान्स केलाय तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहाल. हा डान्स व्हिडीओ आतापर्यंत चार मिलियन लोकांनी पाहिला असून सुमारे तीन लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नववधूचा तिच्या गर्ल गॅंगसोबत स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करताना दिसून येतेय. ‘जलेबी बेबी’ लोकप्रिय गाण्यावर नववधू आणि सोबत तिची गर्ल गॅंग थिरकताना दिसून येत आहेत. आकर्षक लहंगा परिधान करत नववधूच्या वेशभूषेत सजलेल्या या नव्या नवरीच्या अदाकारीने नवरदेवाबरोबरच उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या काळजाचा ठोका चुकला. नवरी आणि तिच्या गर्ल गॅंगच्या ग्रुपचा हा डान्स तिथे उपस्थित लोकही खूप एन्जॉय करत आहेत. नवरीचे डान्स मूव्ह्स पाहून व्हिडीओमध्ये लोक टाळ्या वाजवताना आणि आनंदाच्या भरात जोरजोरात ओरडताना दिसून येत आहेत. नवरीचा प्रोत्साहित करताना लोकांचा आवाज सुद्धा ऐकू येत आहेत. सोशल मीडिया यूजर्सना हा डान्स इतका आवडला आहे की लोक इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

आणखी वाचा : Baby Elephant Video: कसला क्युट आहे हा…! पाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या हत्तीच्या पिल्लूचा VIDEO VIRAL

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात वहिनीसोबत मस्करी करणं दीराला महागात पडलं…नवरीने जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक

हा व्हिडीओ गेल्या महिन्यात ‘वेडिंग_कोरियोग्राफर्स’ नावाच्या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहून या नवरीचे सर्वजण खूपच कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ अक्षरशः वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल चार मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर तब्बल तीन लाख लोकांनीया व्हिडीओला लाइक केलंय. तर नेटिझिन्सनी या व्हिडिओला पसंती देत त्यावर भरभरुन कमेंट्स करत नवरीचे खूप कौतुक केले आहे.

खरं तर आपल्याच लग्नात नवरीबाईने नाचलेलं पाहण्याची आपल्या समाजात मानसिकता नसते. पण म्हणतात ना हौसेला मोल नसतं…एवढे सगळे दागिने, लग्नाचा वजनदार पोशाख घालून ही त्यांनी अप्रतिम डान्स केला आहे. मनापासून एखाद्या गोष्टीची आवड असली की सगळं शक्य असतं याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Desi bride and her bridesmaids dance to jalebi baby in her own marriage viral video google trends trending has over 4 million views prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या