‘पप्पू कॅन डान्स साला’ म्हणत नव्या नवरीने केला जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देसी नवरीचा अनोखा स्वॅग पहायला मिळाला. तिचा हा स्वॅग पाहून वऱ्हाडी मंडळी सुद्धा च्याट पडल्याचं दिसतंय. अनेकांनी तोंडात बोटं घातली नसतील तरच नवल…

desi-bride-and-her-squad-dance-viral
(Photo: Instagram/ choreographybymaheema)

लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. लग्न मंडपात प्रवेश करताना नवरी मुलगी सहसा एकदम शांतपणे, लाजत वगैरे प्रवेश करते, मात्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देसी नवरीचा अनोखा स्वॅग पहायला मिळाला. तिचा हा स्वॅग पाहून वऱ्हाडी मंडळी सुद्धा च्याट पडल्याचं दिसतंय. अनेकांनी तोंडात बोटं घातली नसतील तरच नवल…

लग्न म्हणजे धमाल, मजा मस्ती आणि बरंच काही. लग्नात 2 लोकांची सगळ्यात जास्त मजा असते. पहिले म्हणजे नवऱ्याचे मित्र आणि दुसऱ्या म्हणजे नवरीच्या मैत्रिणी. एकतर त्यांना लग्नात विशेष काही काम नसतं. दुसरं म्हणजे लग्नाच्या पत्रिकेत जिथे ‘व्यर्थ लुडबुड’ म्हणून लहान मुलांची नावे असतात तिथे खरंतर नवरा-नवरीच्या मित्र-मैत्रिणींची नावे टाकायला हवीत. कारण काम शून्य आणि यांची नुसती व्यर्थ लुडबुड असते. पण एक गोष्ट हे मित्र-मैत्रिणी मन लावून करतात. ती गोष्ट म्हणजे डान्स. आमच्याकडे नववधूच्या गर्ल गॅंगचा एक व्हिडीओ आला. मोबाईल चाळता चाळता समोर येणारे व्हिडीओ पाहून काही मिनिटात बोर होणारे सुद्धा हा डान्स पापणी न लवता बघतील.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक देसी नववधू तिच्या गर्ल गॅंगसोबत भन्नाट डान्स करताना दिसून येतेय. ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातील ‘पप्पू कॅन डान्स साला’ या सुपरहिट गाण्यावर ही नववधूचा तिच्या गर्ल गॅंगसोबत केलेला हा डान्स इतका धम्माल होता की, वऱ्हाडी मंडळी आश्चर्यचकित झाली. आकर्षक लेहंगामध्ये सजलेल्या या नव्या नवरीचं सौंदर्य घायाळ करणारं आहे. या व्हिडीओमधल्या नववधूचं नाव कोमल कपूर असं आहे. तिच्या लग्नात तिने मैत्रिणींच्या ग्रूपसोबत हा डान्स परफॉर्मन्स केला आहे. याची कोरिओग्राफी महिमा यांनी केली आहे. एवढे जड कपडे आणि ज्वेलरी घालूनही त्यांची नाचतानाची एनर्जी भन्नाट होती.

या नव्या नवरीने तिच्या लग्नात मैत्रिणीसोबत केलेल्या या डान्स परफॉर्मन्सला टाळ्यांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुळातच गाणं एकदम भारी आहे त्यातही साऊंड सिस्टीम तगडी असल्याने गाण्याचा फील भारी येतो. एवढा सगळा माहोल झाला असल्यावर आपले पाय आपोआप थिरकायला लागतात. ‘पप्पू कॅन्ट डान्स साला’ हे कडवं आल्यानंतर पोरी हुबेहूब मूळ गाण्यातल्या स्टेप्स कॉपी करत उत्स्फूर्तपणे नाचतात. सर्वसामान्य लग्नात अशा कार्यक्रमात नाचताना स्टेप्स चुकल्या किंवा मिस झाल्या तरी चालतं. मात्र तरीही या मुलींकडून एकही स्टेप मिस झालेली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटपर्यंत प्रत्येक जण ह्या गर्ल गॅंगचा डान्स एन्जॉय करत असतो. आम्ही इतकं वर्णन करून तुम्हाला या व्हायरल व्हिडीओबद्दल सांगतोय, मग प्रत्यक्षात तरी हा डान्स नक्की कसा केलाय, हे तुम्ही व्हिडीओतच बघा.

‘choreographybymaheema’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा भन्नाट व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमधील नव्या नवरीसोबतच तिच्या मैत्रिणीच्या डान्सचे स्टेप्स इतके सुंदर आहेत की, रातोरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ शेअर करून फक्त एकच दिवस झालाय तर आतापर्यंत या व्हिडीओला १० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर ४६७ लोकांनी या नववधूच्या गर्ल गॅंगच्या डान्सला लाईक केलंय. या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये नेटिझन्स नव्या नवरीचं कौतुक करताना दिसून येत आहे. मात्र सोशल मीडियावर या नवरीची जोरदार चर्चा रंगलीय एवढं मात्र नक्की…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Desi bride and her squad groove to pappu cant dance on wedding day dont miss viral video prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या