VIRAL VIDEO : नवरा असावा तर असा! नवरीसोबत घडला असा प्रसंग, मग नवरदेवाने जे केलं ते पाहून तुम्हीही हेच म्हणाल…

सध्या सगळीकडे लग्नसराईचा माहौल सुरू आहे. सोशल मीडियावरही लग्नाच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, “नवरा असावा तर असा!” एकदा हा VIRAL VIDEO पाहाच…

groom-helps-bride-struggling-her-lehenga-viral-video
(Photo: Instagram/ witty_wedding)

सध्या सगळीकडे लग्नसराईचा माहौल सुरू आहे. सोशल मीडियावरही लग्नाच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक लग्नाचे मजेदार व्हिडीओ शेअर करताना दिसून येत आहेत. यातील काही व्हिडीओ असे आहेत की ते पाहून लोक हसत आहेत. तर काही व्हिडीओ पाहून कधी कधी आश्चर्यही वाटू लागतं. त्याचबरोबर काही व्हिडीओ लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात. या ट्रेंडमध्ये सध्या लग्नाचा आणखी नवा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप आवडत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा!

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यतला सर्वात खास क्षण. या दिवशी सर्वांच्याच नजरा नवरा-नवरीकडे लागलेल्या असतात. म्हणून या दिवशी सुंदर आणि सर्वांपेक्षा काहीतरी हटके करण्यासाठी प्रत्येक जोडपी प्रयत्न करत असतात. कपड्यांपासून ते अगदी मेकअपपर्यंत सर्व गोष्टींची पूर्ण काळजी घेत असतात. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. लग्नात सुंदर दिसण्यासाठी या नवरीबाईने हलक्या गुलाबी रंगाचा जास्त भरलेला वजनदार लेहंगा परिधान केला होता. कदाचित या नवरीच्या वजनाइतकंच या लेहंग्याचं वजन असावं. पण या वजनदार लेहंग्यांमुळे नवरीची मात्र चांगली फजिती झाली.

लग्नात स्टेजवर चढत असताना या नवरीचा लेहंगा पायाखाली येत असल्याने तिला स्टेजवर येण्यासाठी अडचण येत होती. भावी पत्नीची ही अडचण सजल्यानंतर नवरदेव पुढे सरसावला आणि तिला हात देत तिचा वजनदार लेहंगा सावरू लागला. एका हाताने नवरीचा हात पकडत दुसऱ्या हाताने हा नवरदेव नवरीचा लेहंगा सावरू लागला. जसं जसं नवरदेव या नवरीचा लेहंगा सावरत होता तसं तसं ही नवरी एक एक पायरी वर चढत स्टेजवर पोहोचली. त्यानंतर पुढे ते दोघे एकमेकांचा हात पकडत खुर्चीवर बसण्यासाठी जातात. नवरा-नवरीच्या या गोड क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ४९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय.

आणखी वाचा : आजोबा रॉक्स विदेशी शॉक! फॉरेनरसोबत भर रस्त्यात आजोबांचा जबराट डान्स, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हा VIRAL VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला मिळेल ‘अक्कल मोठी की म्हैस ?’ चं योग्य उत्तर

या व्हायरल व्हिडीओने लाखो लोकांची मने जिंकली. नवरदेवाचं हे नवरीसाठीचं प्रेम पाहून पाहून लोकही भावूक झाले आणि त्याचं कौतुक करू लागले आहेत. हा गोड क्षण ‘witty_wedding’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘हा मला आधी का नाही भेटला?’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. नवरा-नवरीचा हा गोड क्षण प्रत्येकाला भावला आहे. यावर नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. एका यूजरने लिहिलं, ‘किती सुंदर दृश्य’. तर आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिले, ‘मुलगी खूप भाग्यवान आहे’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desi groom helps bride struggling with her lehenga in viral video dulha ho to aisa says internet bride groom google trend prp

Next Story
Viral Video: माशांना तोंडाने खाऊ घालत होता; आणि…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी