भारतीय लोक अत्यंत हुशार आणि कौशल्यवान आहेत यात काही शंका नाही कारण अनेकदा भारतीय असे जुगाड शोधतात ज्याची कल्पना देखील कोणी केली नसेल. सोशल मीडियावर भारतीयांच्या जुगाडचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण अशी सायकल चालवत आहे जी पाहून सर्वांना हॅरी पॉटरची आठवण होईल. होय…योग्य तेच ऐकत आहात. हॉलिवूडमध्ये प्रचंड गाजलेला चित्रपट हॅरी पॉटरबद्दल बोलत आहोत. आजही हा चित्रपट लोक आवडीने पाहतात. चित्रपटाची कथा, पात्र, अभिनय आणि ग्राफिक्स सर्वकाही मंत्रमुग्ध करणारे आहे. हॅरी पॉटर म्हटलं तरी तुमच्या डोळ्यासमोर काय येत…..झाडूवर बसून हवेत उडणारा हॅरी….बरोबर ना. हाच झाडू वापरून एका तरुणाने बाईक तयार केली आहे.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर imran_soyla नावाच्या तरुणाने पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एका तरुणाने एक अशी बाईक झाडू लावलेला दिसत आहे. बाईकला पुढच्याबाजूला स्कूटीचे चाक लावले आहे. तर मागील चाक झाडूमुळे झाकले गेले आहे. बाईकचे सीट असे डिझाईन केले आहे की झाडूवर बसल्याचा भास होत आहे. बाईकला हँडल आणि फ्युअल असलेली प्लास्टिकच्या बाटली लावलेली दिसते ज्याच्या मदतीने ही बाईक सुसाट धावते आहे. व्हिडीओमध्ये तरुणाने हॅरी पॉटर सारखी टोपी आणि काळी शाल देखील बांधलेली दिसत आहे.

हेही वाचा – थरारक! काठीने मारहाण करणाऱ्या व्यक्तीला हत्तीने पायाखाली चिरडले, Viral Video काळजात होईल धस्स

इंस्टाग्रावर व्हिडीओ शेअर करताना “भारतीय हॅरीपॉटर म्हटले आहे.” व्हिडीओवर लाखो नेटकऱ्यांनी कमेटचा वर्षाव केला आहे. एवढंच काय तर फ्लिफकार्टने देखील कमेंट केली आहे. फ्लिपकार्टने कमेंट करताना म्हटले, तुमच्यासाठी हेल्मेट ऑर्डर करू का? त्यानंतर आणखी एक कमेंट करत म्हटले की,”तरीच म्हटले झाडूच्या इतक्या ऑर्डर अचानक का येत आहेत.”

हेही वाचा – टॉयलेटच्या कमोडमध्ये लपला होता भला मोठा कोब्रा; सर्पमित्राने पकडला अत्यंत विषारी साप, Viral Video पाहून उडेल थरकाप

काही नेटकरी व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले की, “इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स” कोणी साफ करणारा झाडून पाहून म्हणाले, “स्वच्छ भारत मिशन” तर काही लोक तरुणाचा लूक पाहून म्हणाले की, “छोटा भीम कार्टुनमध्ये जादूगार चुडेल सारखा दिसत आहे” तर कोणी म्हणाले देसी हॅरी पॉटर”