झिंगाट गाण्यावर फॉरेनर्स झाले ‘सैराट’; एकदा हा VIRAL VIDEO पाहाच…

डान्सच्या बाबतीत भारतीयांचा नादच खुळा….सध्या असाच हा व्हिडीओ व्हायरल होतोय. आनंद व्यक्त करण्यासाठी भारतीय कधीच कमी पडत नाही. याचाच पुरावा देणारा हा VIDEO एकदा पाहाच.

desi indians-dancing-to-zingaat-viral-video
(Photo: Youtube/ Poonam)

आपल्या भारतीयांची सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतीयांना जगाची पर्वा नाही. डाळ-भात हाताने खायचा असेल तर ते खाणारच, मग जगात किंवा आजूबाजूला टाय-शूज घातलेले व्हाईट कॉलर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, याचं आपल्याला भान राहत नाही. डान्सच्या बाबतीतही आपल्या भारतीयांचं अगदी तसंच आहे. बॉलिवूड स्टार हृतिक रोशन कसा नाचतो? हे आपल्या सर्वांना माहितेय. पण जेव्हा याची सिग्नेचर स्टेप्स कॉपी करायला जातो त्यावेळी मात्र ती आपण बिघडवतोच. आनंदा साजरा करण्याबाबतीत भारतीय नेहमी पुढेच असतात. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी भारतीय कधीच कमी पडत नाही. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. अमेरिकेतील एका सिनेमागृहात स्थानिक भारतीय थिरकताना दिसून येत आहेत.

देसी लोकांनी केली धमाल
हा व्हिडीओ अमेरिकेतल्या कोलोरॅडोमधला आहे. हा थिएटरमधला व्हिडीओ आहे. समोर एक पडदा दिसून येत आहे. सैराट चित्रपटातील ‘झिंगाट’ हे गाणं पडद्यावर झळकताना दिसून येत आहे. त्यासमोर अनेकजण नाचत आहेत. होय, हे देसी लोक आहोत, हे थिएटर अमेरिकेत असले तरी या देसी लोकांना काही फरक पडत नाही. जर नाचायची इच्छा असेल जसं येईल तसं मनखुलासपणे नाचलं पाहिजे. हा व्हिडीओ २०१६ मधला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी तो आता पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक महिला दुरून उभी राहून लोकांना नाचताना पाहताना दिसून येतेय. तिच्याकडे बघून असं वाटतं की, तिने आयुष्यात पहिल्यांदाच इतके लोक थिएटरमध्ये नाचताना पाहिले असतील.

आणखी वाचा : सोशल मीडियावर आगीसारखा पसरतोय ‘फायर पाणीपुरी’चा VIRAL VIDEO, पाहून तुम्ही व्हाल हैराण!

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नवा हात मिळाल्यावर चिमुरड्याचा चेहरा फुलला; VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल!

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १९ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्ही आयुष्यात कधी असा डान्स केला आहे का? प्रतिक्रियामध्ये नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Desi indians dancing to zingaat at the screening of sairat in colorado video going viral google trending video today prp

Next Story
लग्नाआधी मित्राने नवरीला विचारलं, “तुला कसं वाटतंय?” मिळालं हे उत्तर, पाहा VIRAL VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी