scorecardresearch

Video : शेतात रोपे लावण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा जुगाड; आता २ शेतकरी मिळून करतात १० जणांची कामे

Viral Video : सोशल मीडियावर शेतकऱ्यांचा हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे, ज्यात शेतकऱ्यांनी रोपे लावण्यासाठी केलेला जुगाड अनेक शेतकऱ्यांना फार आवडला आहे.

farmer desi jugaad video
शेतकऱ्याचा देसी जुगाड व्हिडीओ (फोटो- @TheFigen_ twitter page)

Desi Jugaad Video : सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कधी कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतो तर कधी कोणी मडक्यांपासून कूलर बनवतो. आता असाच एक देसी जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. शेतात रोपे लावण्यासाठी शेतकऱ्याने एक जुगाड करून आपले काम सोपे केले आहे, ज्यामुळे १० जणांचे काम आता दोन शेतकऱ्यांना करणे सोपे झाले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांचा हा जुगाड इतका फायदेशीर आहे की, ज्यामुळे त्याला कुदळ घेऊन खड्डा खणण्याची गरज भासणार नाही. जर जमीन व्यवस्थित नांगरून घेतली असेल तर त्यात रोपे लावण्यासाठी लागणारे अनेक तास या जुगाडमुळे कमी होणार आहेत. या जुगाडमुळे वेळेची आणि पैशाचीही बचत होणार असून मजूर शोधण्याची गरज भासणार नाही. सोशल मीडियावर शेअर केलेला हा जुगाडचा व्हिडीओ आता यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शेतकरी शेतात रोपे लावण्याचे काम करत आहे. मात्र या कामासाठी ना शेतात मजूर दिसत आहेत ना कोणी हाताने काम करताना दिसत आहे.

Viral Video : अवघ्या १० रुपयांत घरच्या घरी तयार केला एसी; तरुणाचा देसी जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क

साधारणपणे शेतात रोपे लावण्यासाठी किंवा बियाणे पेरण्यासाठी ४ ते ५ मजुरांची आवश्यकता असते. या वेळी माती एकदम सैल आणि भुसभुशीत केली जाते, जेणेकरून रोपे लावण्यासाठी खड्डा खणण्याची गरज भासत नाही. यानंतर एका ओळीत ठरावीक अंतर ठेवून रोपे लावली जातात. या कामासाठी बराच पैसा आणि वेळ खर्ची होतो. पण व्हायरल होत असलेल्या जुगाड व्हिडीओमध्ये एक शेतकरी ज्या पद्धतीने शेतात रोपे लावत आहे ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने हातात लोखंडी सळईसारखे काहीतरी धरले आहे. जे दोरी आणि काठीच्या मदतीने बनवण्यात आले आहे. ज्याखाली दोन्ही बाजूंनी ओपन होईल असा शंकू आहे. या वेळी एक व्यक्ती अगदी आरामात रोप लावण्यासाठी तयार केलेले यंत्र मातीत घालते आणि दुसरी व्यक्ती त्यातील शंकूच्या आत एक एक रोप ठेवत जाते. अगदी आरामात दोघे एक एक रोप लावत जातात.

हा व्हिडीओ ट्विटरवर @TheFigen_ वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक यूजर्सना हा जुगाड फार आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 12:31 IST

संबंधित बातम्या