Jugaad Video : सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोकं भन्नाट जुगाड शोधून व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उंच दिसण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे. या व्हिडीओमध्ये उंच दिसण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे. व्हिडीओतील चप्पल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक अनोखी चप्पल दिसेल. उंच दिसण्यासाठी माणूस काय जुगाड करू शकतो, हे तु्म्ही एकदा पाहाच. लोखंडी सळीचा वापर करून चप्पल उंच बनवली आहे. पुढे व्हिडीओत एक व्यक्ती ही चप्पल घालून चालतानासुद्धा दिसत आहे. चालताना तो अगदी सावकाश पावले टाकत आहे.
ही चप्पल पाहून तुमच्या अंगावरही काटा येऊ शकतो; कारण चप्पल इतकी उंच बनवली आहे की, तोल जाताच व्यक्ती खाली पडू शकतो. सध्या या चपलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Gautami Patil : “दिल है छोटा सा…” गौतमी पाटीलने केला चिमुकल्याबरोबर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
bagha_aaba या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चुकून पडला तर दात गोळा करावे लागतील”, तर एका युजरने लिहिलेय, “मार्केटमध्ये नवीन चप्पल आलेली आहे. खेकडा चप्पल..”