Desi Jugaad Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही. पण, काही व्हायरल गोष्टी लोकांचे लक्ष लगेच वेधून घेतात. विशेषत: रोजच्या जीवनाशी निगडित गोष्टी पाहण्यात अनेकांना रस असतो. आता हा व्हिडीओच पाहा ना, ज्यात एक तरुणी ऑनलाइन मुलाखतीमध्ये पास होण्यासाठी असे काही करतेय, जे पाहून लोकही चक्रावून गेले आहेत. तिने मुलाखत घेणाऱ्या परीक्षकांच्या प्रश्नांना पटापट उत्तरे देत इम्प्रेस करण्यासाठी वापरलेला जुगाड अनेकांना आवडला आहे. या ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तिने एआयचा पुरेपूर वापर केला आहे. पण, तिने ही मुलाखत नेमकी कशा पद्धतीने दिली ते आपण जाणून घेऊ…

ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तरुणीची चलाखी

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little Brother ears were pierced video viral
Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
Viral video of a young man puts fire cracker between legs Diwali crackers stunt video went viral on social media
VIDEO: पायांच्या मधोमध ठेवला फटाका अन्…, तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून व्हाल थक्क
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
horrifying video of soan papadi making in this diwali went viral on social media
बापरे! इमारतीच्या भिंतीवर आपटून नंतर पायाने…, पाहा कशी बनवली जाते सोनपापडी, VIDEO होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, एक तरुणी ऑनलाइन मुलाखत देण्यासाठी तिच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसली आहे. पण, ही ऑनलाइन मुलाखत पास होण्यासाठी तिने असा काही जुगाड शोधून काढला आहे की, तो पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल. तरुणीने तिचा मोबाईल ऑन केला आणि तो कॉम्प्युटर सिस्टीमच्या अगदी मधोमध चिकटवला. यावेळी तिने मोबाईलवर एआयदेखील चालू केले आहे. त्यामुळे मुलाखत घेणारा कोणताही प्रश्न विचारतो तेव्हा त्याचे उत्तर AI कडून मिळत आहे, जे वाचून ती समोरच्या व्यक्तीला उत्तर देते आहे. तरुणीचा मुलाखतीदरम्यानचा हा जुगाड पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Read More Trending News : भयंकर! हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग, लहान मुलाने आईच्या डोक्यात घातली बॅट; थरारक घटनेचा Video Viral

हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तिने मोबाईलवर AI ऑन करून नोकरीसाठी मुलाखत दिली आणि व्यावसायिक पद्धतीने प्रश्नांची उत्तरे दिली.’ दरम्यान, या व्हिडीओवर आता युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ही फसवणूक आहे. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, स्मार्ट मूव्ह, मुलाखतींचे भविष्य. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ही कंपनीची अॅसेट बनेल. कारण- दिवसाढवळ्या फसवणूक कशी करायची हे तिला माहीत आहे. शेवटी एका युजरने म्हटले की, एआय ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे.