scorecardresearch

Premium

Desi Jugaad : देशी जुगाड! निकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने तोडा झाडावरील फळे, VIDEO एकदा पाहाच!

निकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने झाडावरील फळे कशी तोडायची हे या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले आहे. हा अनोखा देशी जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

desi jugaad video
देशी जुगाड! निकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने तोडा झाडावरील फळे (Photo : YouTube)

Jugaad Video : झाडावरील फळे तोडणे हे खूप कठीण काम आहे. अनेक जण झाडावर चढून फळे तोडतात; पण आता फळे तोडण्यासाठी झाडावर चढण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण- एक भन्नाट जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निकाम्या प्लास्टिकच्या बाटलीने झाडावरील फळे कशी तोडायची हे या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले आहे. हा अनोखा देशी जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक निकामी प्लास्टिक बाटली घेतली आहे. या बाटलीवर पेनाने आयाताकृती आकार काढला आहे आणि पुढे व्हिडीओत तो आयताकृती भाग कापताना दिसत आहे.
या बाटलीच्या तोंडामध्ये एक लांब सरळ काठी लावली आहे. काठीची लांबी झाडाच्या उंचीनुसार निवडू शकता. ही काठी हातात घेऊन झाडावरील फळे सहज तोडताना व्हिडीओत दिसत आहे. हा भन्नाट व सोपा जुगाड तुम्हालाही आवडू शकतो. सध्या या व्हिडीओची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

viral video Three men rescued after they drive SUV into fast flowing river
भलतं धाडस पडलं महागात! तरुणांनी थेट नदीत उतरवली कार अन्….; थरारक व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा
viral video
नदीचं पाणी वापरून तरुणी पीठ का मळतेय? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
man seen selling goods in a unique style video goes viral
‘कोमलच्या आईला डासांपासून वाचवा’…, वस्तू विकण्यासाठी विक्रेत्याची अनोखी स्टाईल; मजेशीर Video व्हायरल
tiger most trending video
स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची हौस पडली महागात, अचानक पाठीमागून आला वाघ…, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

हेही वाचा : VIDEO : बॉडी बनवण्याचा नाद पडला महागात ! दरवाज्याचा रॉड घेऊन धाडकन् खाली पडला, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

Mr. Shankar या यूट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कोणताही खर्च न करता, निकाम्या वस्तूंपासून उपयोगी वस्तू बनवण्यालाच ‘जुगाड’ म्हणतात. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, कोणताही खर्च न करता फळे तोडण्याचे हे अनोखे यंत्र बनवले आहे. सोशल मीडियावर असे एकापेक्षा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Desi jugaad video of cutting fruit with using waste plastic bottle viral video on youtube ndj

First published on: 02-10-2023 at 12:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×