New Business Idea Viral Video : पैसा कमवणारे लोक कोणत्याही परिस्थितीत कसाही पैसा कमावू शकतात. त्यांना फक्त एक संधी हवी असते. त्या संधीचे सोनं करत ते दिवसाला हजारो, लाखोंची कमाई करू शकतात. असे लोक अगदी छोट्या गोष्टींमध्येही डोकं लावून जितका मिळेल तितका नफा कमवतात. विशेष म्हणजे ते पैसा कमवण्यासाठी असा काही भन्नाट जुगाड शोधतात, ज्यात खर्चही कमी येतो. अशाच प्रकारे एका व्यक्तीने पेट्रोल पंपाबाहेर पैसा कमवण्यासाठी भन्नाट जुगाड शोधून काढला आहे, ज्यातून तो रोज हजारोंची कमाई करतोय. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तुम्ही पेट्रोल पंपावर पाहिलं असेल, पेट्रोल- डिझेल भरणाऱ्या वाहनचालकांची मोठी गर्दी असते. याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने चक्क पेट्रोल पंपाजवळ आपला अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या दुचाकी स्वारांना भाड्याने हेल्मेट देण्याचा व्यवसाय त्याने सुरू केलाय.

Shocking video of little boy making pushpa style reel after car accident video viral on social media
बापरे! कारचा चक्काचूर, कुटुंब मृत्यूच्या दारात अन् चिमुकला बनवतोय रील; VIDEO पाहून बसेल धक्का
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Young girl wearing Bra in indore market shocking video viral on social media
एका रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणी भररस्त्यात ब्रा घालून गेली अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल
Puneri video young girl stopped bikes were using footpaths said to follow traffic rules video viral on social media
नियम म्हणजे नियम! पुणेकरांच्या नादाला लागू नका; वाहतूक नियम मोडणाऱ्यांबरोबर तरुणीने काय केलं पाहा…, VIDEO व्हायरल
Shocking video of car took reverse leads to little boy accident mother panicked
बापरे! रस्त्याच्या कडेला बसलेल्या लहान मुलाच्या अंगावर घातली गाडी, आई धावत गेली अन्…, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
funny video the boys going on a scooty took the smoke lightly
रस्त्यावर धूरच धूर, तरुण स्कुटी घेऊन पुढे गेला अन् घडलं असं काही की…; Viral Video पाहून पोट धरून हसाल
Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
desi jugaad video
Desi Jugaad: सिगारेटचं व्यसन सोडवण्यासाठी अनोखा जुगाड; व्यक्तीने डोक्यात घातला पिंजरा अन्… पाहा भन्नाट VIDEO

पेट्रोल पंपाबाहेर हेल्मेट घेऊन बसला अन्….

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस पेट्रोल पंपासमोर काही हेल्मेट घेऊन बसला आहे, जो लोकांना पाच रुपयांना हेल्मेट भाड्याने देत आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा नियम लागू केला गेला असेल. पण, यातून एका व्यक्तीने पैसे कमवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. या व्यक्तीने पैसा कमवण्यासाठी शोधलेला हा भन्नाट जुगाड आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

पैसा कमवण्याचा हा जुगाड व्हिडी @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, तो एक कुशल बिझनेस मॅन आहे. दुसऱ्या युजरने लिहिले – व्वा, किती भन्नाट व्यवसाय आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, आता फक्त पैसाच पैसा असेल. शेवटी एकाने लिहिले की, दोघेही त्यांचे काम करत आहेत, पण विश्वास आवश्यक आहे.

Story img Loader