Desi Jugaad Video : चोर कोणत्या घरात मोठी चोरी करायला मिळेल याची योग्य संधीच शोधत असतात, त्यामुळे लोकांना आपले दागिने, पैसे चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागतात. विशेषत: जेव्हा आपण काही दिवस बाहेर जात असतो तेव्हा घरात चोरी होण्याची अधिक भीती असते. अशा परिस्थितीत आपले दागिने, पैसे चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी एका महिलेने भन्नाट जुगाड शोधून काढलाय. या जुगाडमुळे चोर घरात शिरल्यानंतर दागिने, पैसे शोधून शोधून दमतील. या जुगाडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ज्यांच्याकडे बँक लॉकर नाही त्यांच्यासाठी हा जुगाड खरंच कामी येईल. या व्हिडीओत महिलेने दागिने आणि पैसे अशा ठिकाणी लपवले आहेत, जे चोरांच्या नजरेसही पडणार नाहीत.

व्हिडीओत पाहू शकता की, एक महिला तिचे मौल्यवान दागिने आणि पैसे एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती गुंडाळते. यानंतर ती पिशवी कोणाच्या नजरेस पडू नये यासाठी पडद्याच्या लोखंडी फासात अडकवते. यानंतर पिशवी पडद्यामागे लपवते. अशाप्रकारे तिने दागिने आणि पैसे चोरांपासून सुरक्षित ठेवले. पण कुणास ठाऊक, चोरांनी मॅडमचा व्हिडीओ पाहिला तर… त्यामुळे लोकसत्ता डॉट.कॉम तुम्हाला हा हॅक करण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करत नाही.

मानसिकदृष्ट्या कोणी आपले दागिने किंवा पैसा अशाप्रकारे पिशवीत गुंडाळून ठेवण्याची कल्पना करणार नाही, कारण अशा वस्तू ठेवण्यासाठी बँक लॉकर किंवा कपाटच लोक सुरक्षित मानतात.

सोन्याचे दागिने किंवा पैसा लपवण्याचा हा भन्नाट जुगाड व्हिडीओ @shiprarai2000 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही विविध कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, चोरांना तुम्ही चांगल्या कल्पना देत आहात. दुसऱ्या युजरने लिहिले की, दीदी तुमच्या घरचा पत्ता काय आहे, तिसऱ्याने लिहिले की, चोरही इन्स्टाग्राम वापरत असतील तर या जुगाडचा उपयोग काय?