Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यावर तुम्ही देसी जुगाडांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असेच काहीसे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरु आहे. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाने लोकांचे हाल केले आहे. या उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक आता केवळ एसी किंवा कुलर्स खरेदी करत नसून देसी जुगाड करु लागले आहेत. सध्या या जुगाडांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे हसू वारण कठीण होईल.

सध्या सगळीकडे उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. देशातील तापमानात वाढ होत असताना महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाल्यानं उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी लोक घराबाहेर पडणे टाळत आहे. अशात उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्यावी आणि उन्हापासून कसे संरक्षण करावे, यासाठी काही टिप्स सांगणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एका तरुणाने उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी भन्नाट जुगाड सांगितला आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणमंडळींसाठी हा जुगाड खूप फायदेशीर आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यातील कडक उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाने शोधला बेस्ट जुगाड

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. तो उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी एक भन्नाट जुगाड सांगत आहे. या जुगाडच्या मदतीने तुम्ही तुमचे घर एसी, कुलरविना थंड ठेवू शकता. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण सांगतो, “मुलांनो, जर तुम्ही पुण्यात राहात असाल आणि तुम्हाला कुलर एसी खरेदी करायची नसेल आणि तुम्ही पीजीमध्ये राहात असाल तर तुम्ही हा जुगाड करू शकता. तुम्ही असा पडदासारखी चादर लावा आणि बसून त्यावर पाणी शिंपडा आणि तुमची रूम थंड होणार. राजस्थानीज जुगाड.” हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. गेल्या पाच दिवसात हा व्हिडीओ तीन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

पाहा व्हिडीओ

हे व्हिडिओ आणि यांसारख्या अनेक देसी जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने India is Not For Beginners अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने भारतातील देसी इंजिनियर्सचा दर्जा १००% आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हे जुगाड भारताबाहेर गेले नाही पाहिजेत असे म्हटले आहे. सध्या या देसी जुगाडांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.