AI jugaad For Pigeons Viral Video : बाल्खनी असो किंवा एखाद्या ऑफिसची खिडकी कबुतर सतत येऊन घाण करतात. कबुतरांनी केलेल्या या घाणीमुळे तसेच त्यांच्या पंखांमुळे श्वसनाशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सगळेच स्वतःचे कबुतरांपासून संरक्षण करण्यासाठी जाळी लावणे, टाळ्या वाजवून त्यांना हकलवणे आदी अनेक जुगाड आपण करून पाहत असतो. मात्र आता एका टेक्नॉलॉजीप्रेमी व्यक्तीने या समस्येवर भन्नाट उपाय शोधला आहे. एआयच्या मदतीने चालणारी स्वयंचलित “वॉटर गन टरेट” (water gun turret) तयार केली आहे.
मशीन कबुतरं दिसताच त्यांना ओळखते आणि पाण्याचा फवारा मारून त्याला हाकलवून लावते. या स्मार्ट सिस्टीममध्ये कॅमेरा, मोशन ट्रॅकिंग आणि एआय डिटेक्शनचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ती फक्त कबुतरांनाच लक्ष्य करते आणि इतर पक्षी किंवा माणसांना त्याचा त्रास होत नाही. पोस्टच्या कॅप्शननुसार ही सिस्टम थेट व्हिडीओ फुटेज घेण्यासाठी कॅमेऱ्याचा वापर करते. तर एक एआय व्हिजन मॉडेल रिअल-टाइममध्ये कबुतरांना ओळखते. एकदा कबुतर दिसला की, सर्वो मोटर्सवर बसवलेली वॉटर गन आपोआप पक्ष्याच्या दिशेने वळते आणि त्याला घाबरवून पळवून लावण्यासाठी पाणी फवारते.
ही भन्नाट एआय-आधारित कबुतर संरक्षण प्रणाली ऑरेंज पाय ५ (Orange Pi 5) या मिनी कॉम्प्युटरवर चालते आणि या सेटअपमध्ये बॅटरीवर चालणारे वॉटर गन, एक यूएसबी कॅमेरा, दोन सर्वो मोटर्स, रेझिस्टर्स आणि एक ट्रान्झिस्टर या इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही स्मार्ट प्रणाली रॉकचिप ३५८८ (Rockchip 3588) च्या अंगभूत न्यूरल प्रोसेसिंग युनिट (NPU) चा उपयोग करते.ही संपूर्ण सिस्टीम “YOLO World V2” या प्रगत एआय मॉडेलवर आधारित असून, ते रिअल-टाइम ऑब्जेक्ट डिटेक्शनसाठी ओळखले जाते.
व्हिडीओ नक्की बघा…
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा शोध पक्ष्यांना कोणतीही इजा करत नाही आणि केवळ पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून त्यांना हाकलून लावतो.@om_patel5 या एक्स (ट्विटर) युजरने ओम पटेल यांनी शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात त्यांनी हे यंत्र कसे काम करते हे स्पष्ट करताना यांनी लिहिले की, “कबुतरे बाल्कनीमध्ये सतत घरटी करत होती, म्हणून ही सिस्टम तयार केली आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. युजर्सनी याला “फ्युचरिस्टिक बाल्कनी सिक्युरिटी” असंही म्हटलं आहे आणि शहरी रहिवाशांमध्ये, जे नियमितपणे बाल्कनीमध्ये घुसणाऱ्या, कपडे खराब करणाऱ्या आणि अपार्टमेंटमध्ये घरटी बांधणाऱ्या कबुतरांचा सामना करणारे उत्तम गॅजेट म्हंटले आहे.
