Desi Jugaad Video Viral : पैसा कमावणारे लोक कोणत्याही परिस्थितीत कसाही पैसा कमावू शकतात. फक्त त्यांना एक संधी हवी असते. त्या संधीचे सोने करीत ते दिवसाला हजारो, लाखोंची कमाई करू शकतात. असे लोक अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही डोके लावून जितका मिळेल तितका नफा कमावतात. विशेष म्हणजे ते पैसा कमवण्यासाठी असा काही जुगाड शोधतात की, ज्यात खर्चही कमी येतो. अशाच प्रकारे एका पेट्रोल पंपाच्या मालकाने बक्कळ पैसा कमावण्यासाठी एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे आणि त्याद्वारे तो रोज मोठ्या प्रमाणात कमाई करतोय. त्यासाठी त्याने पेट्रोल पंपाबाहेर असे एक पोस्टर लावले आहे, जे आता अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
तुम्हाला माहीतच असेल की, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोलचे वेगवेगळे दर असतात. हेच लक्षात घेऊन झारखंडमधील एका पेट्रोल पंपाच्या मालकाने थोडा बुद्धीचा वापर करून पंपाबाहेर एक असा बोर्ड लावला की, लोक पेट्रोल खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले.
या बोर्डाचा फोटो आता व्हायरल होत आहे. या बोर्डवर लिहिले आहे की, बिहारमध्ये पेट्रोल आठ रुपयांनी महाग आहे. हा झारखंडमधील शेवटचा पेट्रोल पंप आहे, त्याचा फायदा घ्या. त्यानंतर खाली पेट्रोल पंपाच्या दिशेने एक बाण दाखवला आहे आणि त्यावर लिहिले आहे की, अर्जदार- झारखंड फ्यूल स्टेशन.
पेट्रोल पंपावरील या भन्नाट बोर्डाचा व्हिडीओ @ermanishkasyap नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो आता तुफान व्हायरल होतोय. तर त्यावर लोकही भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, बिझनेस माइंड. दुसऱ्याने लिहिले की, हा सर्व बिहारमध्ये दारूबंदी घालण्याचा परिणाम आहे. तिसऱ्याने लिहिले की, हा व्यवसाय आहे. त्याच वेळी अनेक युजर्सही मजेदार कमेंट्स करीत आहेत.