VIRAL VIDEO : थंडी वाजते म्हणून मुलीने ओढणी मागितली, तर पाहा आई काय म्हणाली?

गुलाबी थंडीत सगळ्यात मोठी समस्या उद्भवते ती म्हणजे कपड्याची. अशात हल्लीच्या मुली तर स्टाईल आणि फॅशनमध्ये राहण्याच्या नादात स्वेटर घालणं पसंत करत नाहीत. काकडून जाणं त्या सहन करतात, पण स्टायलिश कपड्यांवर स्वेटर ते बिलकूल पसंत करत नाहीत. अशा मुलीला आईने जे उत्तर दिलंय ते पाहाच.

mother-daughter-dupatta-viral-video
(Photo: Instagram/ rosettebyyashna)

सध्या हिवाळ्यामुळे गुलाबी थंडी पडू लागली आहे. हिवाळ्यात सगळ्यात मोठी समस्या उद्भवते ती म्हणजे कपड्याची. अशात हल्लीच्या मुली तर स्टाईल आणि फॅशनमध्ये राहण्याच्या नादात स्वेटर घालणं पसंत करत नाहीत. सध्या सगळीकडे लग्नसराईचा माहौल सुरूय आणि विशेषतः लग्नात हल्लीच्या मुली स्टायलिश कपड्यांवर स्वेटर घालणं टाळताततच. मग थंडीने काकडून जाणं त्या सहन करतात, पण स्टायलिश कपड्यांवर स्वेटर ते बिलकूल पसंत करत नाहीत. असंच काहीसं एका मुलीसोबत घडलंय. ही मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत स्वेटरशिवाय बाहेर पडली खरी…पण जेव्हा थंडी वाजायला लागली तेव्हा तिने तिच्या आईकडे ओढणी मागितली. तेव्हा आई जे बोलली ते सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. ओढणी मागितल्यावर आईच्या प्रतिक्रियेची लोक आता खिल्ली उडवत आहेत. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

यशना हांडा या युजरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती एका खुल्या एअर रेस्टॉरंटमध्ये आईसोबत बसलेली दिसत आहे. जेव्हा तिला थंडी जाणवते तेव्हा ती तिच्या आईची पिवळी ओढणी अंगावर घेते, हे स्पष्टपणे दिसतं. तिने असं केल्यावर तिची आई तिला गमतीने म्हणते, “तू बेब बनून आली आणि ओढणी तुला बेबेची पाहीजे….” या व्हिडीओ शेअर करताना एक मजेदार कॅप्शन सुद्धा दिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “थंडी वाजू लागली की सर्व बेबनेस निघून जातो.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न मंडप सोडून नवरी पोहोचली जीममध्ये… ब्रायडल ड्रेसमधला तिचा वर्कआऊट पाहून नेटकरी हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता हेअर ड्रायर विकत घेण्याची गरज नाही! हा देसी जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल What An Idea !

हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. म्हणूनच या व्हिडीओला आतापर्यंत १.४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आईचं असं बोलणं लोकांना काही खास आवडलेलं नाही. यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटलंय की, “आता आम्ही अशा बोलण्याला असभ्य म्हणतो.” तर काही युजर्सनी आईच्या या वाक्याचं कौतुक केलंय. तिचं कौतुक करताना एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं, “बेब ऑन पॉइंट.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Desi moms reaction to daughter asking for her dupatta goes viral online savage says internet google trending video today prp