Desi woman riding with fast bullet on the road video goes viral on social media gps 97 | Loksatta

Video: डोक्यावर पदर, लेहेंगा आणि ते…; ‘या’ दोन महिलांच्या तुफान बुलेटस्वारीवर नेटकरीही फिदा

देसी महिलेची तूफान बुलेटस्वारी पाहिलीत का?

Video: डोक्यावर पदर, लेहेंगा आणि ते…; ‘या’ दोन महिलांच्या तुफान बुलेटस्वारीवर नेटकरीही फिदा
photo(social media)

Viral Video of Desi Woman Bullet Riding: दुचाकी चालवण्याची हौस प्रत्येकाला असते. त्यात जर बुलेट असेल तर मग विचारायलाच नको. बुलेटवर स्टंट करण्याचे किंवा बुलेट चालवण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला एकदा तरी बुलेट चालवावी अशी इच्छा असते. सध्या सोशल मीडियावर एका बुलेट रायडिंगचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. कारण या व्हिडिओत बुलेट चालवताना एक महिला दिसत आहे. बुलेट चालवताना तिच्या मागे आणखी एक महिला डबल सीट बसली आहे. विशेष म्हणजे या दोघांचीनीही लेहेंगा चोळी घातली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लगेच तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.

लेहेंगा घालून बुलेट चालवणारी महिला

हा देसी स्टाईल बुलेट चालवणाऱ्या महिलेचा स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लेंहेंगा घातलेली एक महिला वेगाने बुलेट चालवताना दिसत आहे. तिच्याबरोबर आणखी एक महिला पाठीमागे बसली आहे. या दोघेही बुलेटवर बसून धमाल करताना दिसत आहेत. डोक्यावर पदर, कपाळी टिक्का आणि मनमोकळेपणाने हसत या दोघी बुलेट चालवण्याचा आनंद घेत आहेत.

( हे ही वाचा: ऐ…ऐ माझी चप्पल सोड! महिलेने सापाला चप्पल मारताच साप ती चप्पलच घेऊन पळाला, पाहा Video)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: आईस्क्रीम देत नाही म्हणून चिमुरडी लागली रडायला; रागाच्या भरात असे काही केलं की…)

या महिलेंचा बुलेट चालवतानाचा भन्नाट व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्याचबरोबर नेटकरी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. बुलेट चालवण्यातील तिचा आत्मविश्वास नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही महिला बुलेट चालवत असताना हा व्हिडिओ कोणीतरी बनवला आहे. ज्या प्रमाणे महिला बुलेट चालवते आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ बनवणारी व्यक्तीदेखील बाइकवर बसून व्हिडिओ शूट करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 14:14 IST
Next Story
‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच