लग्नात वहिनीने दीरासोबत केला इतका जबरदस्त डान्स की, नवरी पाहातच राहिली…

दीराच्या लग्नात वहिनीचा डान्स जणू हल्लीच्या लग्नातला ट्रेंडच बनत चालला आहे. अशाच एका वहिनीने दीराच्या लग्नात जबरदस्त डान्स केलाय. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड फ्रेश होईल हे मात्र नक्की.

Dever-Bhabhi-Dance-Video
(Photo: Youtube/ khurafaati )

कोणत्याही घरात दीर आणि वहिनीची जोडी सर्वात हिट मानली जाते. हे नातं मातृत्व आणि मैत्रीचं मिश्रित मानलं जातं. भारतीय लग्नांमध्ये वहिनींची भूमिका महत्त्वाची मानली जाते आणि अशात लग्नातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासोबतच आपल्या दीरासोबत गंमतही करत असते. सोशल मीडियावर दीर आणि वहिनीचे मजेदार व्हिडीओ शेअर होतच असतात. दीराच्या लग्नात वहिनीचा डान्स जणू हल्लीच्या लग्नातला ट्रेंडच बनत चालला आहे. अशाच एका वहिनीने दीराच्या लग्नात जबरदस्त डान्स केलाय. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड फ्रेश होईल हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्हिडीओमध्ये दीराच्या लग्नात स्टेजवर वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील ‘लो चली में अपने देवर की बारात लेकर’ या गाण्यावर तिने अप्रतिम डान्स केलाय. वहिनीचा हा धांसू डान्स पाहून दीर सुद्धा तिच्यासोबत ठूमके लावताना दिसत आहे. दोघांचा डान्स लोकांना इतका आवडला आहे की लोक दोघांवरून आपल्या नजरा हटवू शकले नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आणखी वाचा : वऱ्हाडींना मागे टाकत नवरदेव वरातीत एकटाच नाचू लागला, या गाण्यावरचा क्लासिकल डान्स VIDEO VIRAL

या व्हिडीओमधल्या वहिनीचा कूल अंदाज लोकांना फारच आवडलाय. हा व्हिडीओ khurafaati नावाच्या युट्यूब चॅनवरून अपलोड करण्यात आलाय. बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लग्नाचा सीझन सुरू असल्याने प्रत्येक जण हा व्हिडीओ आवर्जून पाहत आहेत. या व्हिडीओमधल्या वहिनी आणि दीराच्या जोडीचा अप्रतिम डान्स पाहिल्यानंतर नवरी मात्र पाहतच राहिली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : क्या बात है! स्कायडायव्हिंग करताना उंच आकाशातून आई-वडिलांना केला व्हिडीओ कॉल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हिमालयातील बर्फाच्छादित शिखरावर ITBP जवानांनी खेळला लहानपणीचा ‘हा’ खेळ

लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट करताना दिसून येत आहे. यावर एका यूजरने कमेंट करताना म्हटले आहे की, दीराच्या लग्नात वहिनीने डान्स केला तर काय हरकत आहे.” तर आणखी एका चाहत्याने लिहिलं की,” सो स्वीट… हे गाणं एव्हरग्रीन आहे. दोघांचा हा डान्स आणि स्टाइल लोकांना खूप आवडते”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dever bhabhi dance video trending on social media people surprised seeing the expression of bride prp

Next Story
VIRAL VIDEO : क्या बात है! स्कायडायव्हिंग करताना उंच आकाशातून आई-वडिलांना केला व्हिडीओ कॉल
फोटो गॅलरी