Viral video: सध्या फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याचा सिझन आहे. मे महिना सुरु झाल्यावर खवय्यांना हापूस आंब्याचा वेध लागतात. कोकणातील देवगड आणि रत्नागिरी हापूसची चव जगभरातील खवय्यांच्या पसंतीला पडलेली आहे. कोकणच्या हापूसला बाजारात मोठी मागणी आहे. मुंबईमधील बाजारपेठांमध्ये आंब्यांची आयात मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे बऱ्याच वेळा हापूस आंब्याच्या नावाने वेगळचा कोणता आंबा ग्राहकांचा माथी मारला जातो. सर्वसामान्यांना हापूस आंबा ओळखता येत नाही.

बाजारात हापूस आंब्यांच्या वाढत्या दराचा गैरफायदा घेत काही फळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी-देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातून येणारे स्वस्त आंबे विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. याचबरोबर अस्सल कोकणी हापूसची ओळखही धूसर होत चालल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यामध्ये आंबे खरेदी केलेल्या एका महिलेची मोठी फसवणूक केली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला आंबे कापताना दिसत आहे. यावेळी वरुन हे आंबे पिवळ्या रंगाचे आणि अगदी छान पिकलेले दिसत आहेत. बघितल्यावर लगेच कुणीही हे आंबे विकत घेईल अशाप्रकारे हे आंबे दिसत आहेत. मात्र या महिलेने जेव्हा हे आंबे खाण्यासाठी कापले तेव्हा मात्र जे दिसलं ते संतापजनक होतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक दोन नव्हे तर तब्बल एक डझन आंबे खराब निघाले आहेत. संपूर्ण आंबा आतमधून सडलेला आहे. बाजारात देवगड हापूस आंबा घेताना अनेकांची फसवणूक होते. देवगड म्हणून फळविक्रेता वेगळाच हापूस आंबा ग्राहकांच्या माथी मारत देत असतो. सर्वसामान्यांना खरा हापसू कसा ओळखता येत नाही. असाच प्रकार या महिलेसोबत घडला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shabanashaikh6310 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.