Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका जावा-जावांचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन जावा-जावा पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात ‘चला जेजुरीला जाऊ’ या गाण्यावर डान्स करत आहेत. दोघींच्या चेहऱ्यावरील उत्साह, ताल आणि दिलखुलास अभिनयाने पाहणाऱ्यांच्या मनात घर केलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत जावा-जावांनी जांभळ्या आणि हिरव्या रंगांची साडी नेसलेली आहे. कपाळावर कुंकू आणि नाकात नथही घातलेली आहे. काही वेळाने दोघीजणी एका मराठी गाण्यावर डान्स करत आहेत. या जावा- जावांनी त्यांच्या डान्सनी सर्वांनाच वेड लावलं आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.

पाहा व्हिडीओ

अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ priyanka.lewalkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.