Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका जावा-जावांचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन जावा-जावा पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात ‘तुझ्यामुळे झाला माझ्या नशिबाचा वडापाव’ या गाण्यावर डान्स करत आहेत. दोघींच्या चेहऱ्यावरील उत्साह, ताल आणि दिलखुलास अभिनयाने पाहणाऱ्यांच्या मनात घर केलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत जावा-जावांनी पिवळ्या रंगांची साडी नेसलेली आहे. काही वेळाने दोघीजणी एका मराठी गाण्यावर डान्स करत आहेत. या जावा- जावांनी त्यांच्या डान्सनी सर्वांनाच वेड लावलं आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल
पाहा व्हिडीओ
अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.
प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी संभळीवर नवरी लग्नात थिरकली आहे. पारंपारीक पद्धतीने वाजणाऱ्या संभळच्या तालावर नवरीचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. यावेळी नवरीसोबत इतर महिलांनीही ठेका धरत डान्स केला आहे.
