धाकड नवरी! स्वतःच गाडी चालवत पोहोचली लग्न मंडपात; VIDEO तुफान व्हायरल

लग्नात नवरी मंडपात नववधूच्या रूपात सजून नवरदेव येण्याची वाट पाहत बसलेली असते, हे तुम्ही पाहिलं असेल. पण या व्हायरल व्हिडीओमधील या नवरीने चक्क स्वतः गाडी चालवत मंडप गाठलंय. या धाकड नवरीचा बिनधास्त अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतोय.

desi-bride-drives-to-wedding-venue-viral-video
(Photo: Instagram/ parulgargmakeup)

बदलत्या काळाबरोबर सगळेच बदलतात, माणसांबरोबरच परंपरा देखील बदलताता. एका लग्नात असंच एक दृश्य पाहायला मिळेले आहे. पूर्वीच्या काळात नववधू लग्नात लाजायच्या, त्यांची नजर देखील वर उचलायची नाही. परंतु आता काळाप्रमाने ते देखील बदललं आहे. आजच्या मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालतात, त्यामुळे त्यांचा थाट देखील वेगळाच असतो. सध्या अशाच एका धाकड नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरीबाई स्वतः गाडी चालवत लग्न मंडपात पोहोचली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या धाकड नवरीच्या व्हिडीओमध्ये नववधूची अगदी बिंधास्त स्टाईल पाहायला मिळत आहे. लग्नात नवरी मंडपात नववधूच्या रूपात सजून नवरदेव येण्याची वाट पाहत बसलेली असते, हे तुम्ही पाहिलं असेल. पण या व्हायरल व्हिडीओमधील नवरीने मंडपात बसून न राहता अगदी मुलांप्रमाणेच स्वतः गाडी चालवत लग्न मंडप गाठलंय. आतापर्यंत नवरीने लग्न मंडपात ढासू एन्ट्री केल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण जे पुरूष करू शकतात, ते आजच्या मुलीही करू शकतात, हे सांगण्यासाठी ही नवरी नववधूच्या वेशभूषेत सजून स्वतः गाडी चालवत लग्न मंडपात पोहोचली. इंटरनेटवर या धाकड नवरीचा व्हिडीओ रेकॉर्ड तोड व्हायरल होताना दिसून येतोय.

या व्हिडीओमधील धाकड नवरीचं नाव आकृती सेठी असं आहे. लग्नासाठी आकर्षक लहंग्यात साज श्रृंगार करून नवरी लग्नाला पोहोचण्यापूर्वी हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. आकर्षक लहंगा, त्यावर साजेशी ज्वेलरी परिधान करून ही धाकड नवरी गाडी चालवताना दिसून येतेय. यावेळी गाडी चालवताना ‘विवाह’ चित्रपटातलं ‘हमारी शादी में’ या गाण्यावर ताल धरताना दिसून येतेय. आयुष्यातल्या सर्वात खास दिवसासाठी ही नवरी खूपच उत्सुक दिसून येतेय. लग्नासाठीचा तिचा आनंद नवरीच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे झळकतोय.

नवरीची मेकअप आर्टिस्ट पारुल गर्गने या धाडक नवरीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर या धाडक नवरीचा बिनधास्त अंदाज पाहून हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य आणि कौतुक अशा दोन्हीही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ९८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक करत नवरीच्या बिनधास्त अंदाजाचं कौतुक केलंय. या आधुनिक नववधूने एक नवीन पायंडा पाडला आहे एवढं नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhaakad dulhan bride desi bride drives to wedding venue in viral video watch prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी