scorecardresearch

घटस्फोटाच्या अफवांवर धनश्रीने सोडले मौन; इन्स्टावर पोस्ट करत म्हणाली, “या आहेत माझ्या…”

इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि युजवेंद्रने डिलीट केलेल्या इन्स्टा स्टोरीनंतर दोघांमध्ये वाजल्याची चर्चा असतानाच ते दोघे घटस्फोटासाठी अर्ज करणार असल्याच्याही अफवा उठल्या.

घटस्फोटाच्या अफवांवर धनश्रीने सोडले मौन; इन्स्टावर पोस्ट करत म्हणाली, “या आहेत माझ्या…”
स्वतः धनश्रीने चहलबरोबरच्या वैवाहिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या अफवांवर मोठे वक्तव्य केले आहे. (Instagram/dhanashree9)

भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि युजवेंद्रने डिलीट केलेल्या इन्स्टा स्टोरीनंतर दोघांमध्ये वाजल्याची चर्चा असतानाच ते दोघे घटस्फोटासाठी अर्ज करणार असल्याच्याही अफवा उठल्या.

धनश्रीने लग्नानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये बदल करत चहल आडनाव जोडलं होते. मात्र अलीकडेच तिने चहल आडनाव काढून धनश्री वर्मा असा बदल केला. महत्त्वाचं म्हणजे, धनश्रीने नावात बदल केल्यानंतर चहलनेसुद्धा आपल्या अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ‘नवीन आयुष्याची सुरूवात’ असं लिहिलेली स्टोरी चहलने काही वेळानंतर डिलीट केली. यामुळे चाहते बुचकळ्यात पडले आणि त्यानंतर दोघेही घटस्फोट घेत असल्याची चर्चा रंगली.

IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी

मात्र, आता स्वतः धनश्रीने युजवेंद्र चहलबरोबरच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांवर मोठे वक्तव्य केले आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तिने तिचा एसीएल लिगामेंट फाटल्याचे उघड केले आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित निराधार अफवांवरही भाष्य केले. धनश्री पुढे म्हणाली की, चहल आणि त्यांच्या नात्याबद्दलची बातमी घृणास्पद आणि मन दुखावणारी होती.

धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. तिने लिहिले की, तिच्या दुखापतीदरम्यान ती कठीण काळातून गेली आहे. यादरम्यान चहल आणि लोकांनी साथ दिल्याबद्दल तिने त्यांचे आभार मानले आहेत. चहलने धनशीच्या पोस्टवर एक कमेंटही केली होती, ज्यामध्ये त्याने ‘माय वूमन’ असे लिहिले होते.

IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअ‍ॅक्शन

दरम्यान, चहल आणि धनश्रीच्या नात्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झालेल्या असतानाच युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामला एक स्टोरी शेअर करून या चर्चांवर भाष्य केलं होतं. यामध्ये त्याने पत्नीसोबत घटस्फोट झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं. तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंतीही केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhanshree verma breaks silence on divorce rumours here are my real life updates she posted on instagram pvp

ताज्या बातम्या