भारतीय लग्नसोहळा म्हंटल की आउट ऑफ बजेट सोहळा असणार हे ठरलेलं असत. अनेक जण तर मोठ लग्न करायचं म्हणून आवर्जून सेव्हिंग करतात आणि लग्न मोठ्या थाटामाटात साजरा करतात. परंतु  मध्य प्रदेशातील एका जोडप्याने एकदम साध लग्न करून एक उदाहरण मांडले आहे. त्यांच्या लग्नात तिथे बॅन्ड बाजा न्हवता की वरात न्हवती. या जोडप्याने लग्नात अवघे ५०० रुपये खर्च करून सर्वांनसमोर आदर्श मांडला आहे. या लग्न सोहळ्याची चर्चा सोशल मिडियावर होत आहे. शिवांगी जोशी, धार शहर दंडाधिकारी यांनी सोमवारी साध्या सोहळ्यात लडाख येथे तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या मेजर अनिकेत चतुर्वेदीशी लग्न केले. हे जोडपे भोपाळचे आहेत.

दोन वर्षापूर्वीच ठरले होते लग्न!

शिवांगी जोशी आणि अनिकेत चतुर्वेदीशी यांचे लग्न दोन वर्षांपूर्वीच ठरले होते. परंतु कोविड सारखा साथीचा आजार  सुरू झाल्यापासून शिवांगी कोविड योद्धा म्हणून सेवा देत असल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले होते. या जोडप्याने त्यांच्या कुटूंबाशी चर्चा केली आणि भव्य विवाह सोहळ्यावर पैसे खर्च करू नका असा संदेश पाठवण्यासाठी कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता

असा पार पडला लग्न सोहळा!

शिवांगी जोशी आणि अनिकेत चतुर्वेदी यांनी सोमवारी कोर्टात ५०० रुपये भरून लग्न केले. या सोहळ्यासाठी केवळ पुष्पहार व मिठाईची व्यवस्था करण्यात आली होती. लग्नाला कुटुंबातील काही सदस्य व काही कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आलोक कुमार सिंह, एडीएम सलोनी सिडाना व अन्य कर्मचारी सदस्य उपस्थित होते. विवाहानंतर नवविवाहित जोडप्याने धारेश्वर मंदिर गाठले आणि भगवान धरणाचे आशीर्वाद घेतले.जोशी यांनी माध्यमांना सांगितले की, “लग्नामध्ये अवास्तव खर्च करु नका, म्हणूनच आम्ही असे लग्न केले. मोठ लग्न  केल्याने केवळ वधूच्या कुटूंबावर दबाव येत नाही तर कष्टाच्या पैशाचा गैरवापर देखील होतो.”

शिवांगी आणि अनिकेत यांचे लग्न म्हणजे समजापुढे मोठा आदर्श आहे. आपणा कमी पैशात दिखाऊपणा न करता सहज लग्न करू शकतो.