Dharmendra Pradhan Expose BJP Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला. हा व्हिडीओ एका न्यूज शोचा भाग असल्यासारखा दिसत होता. यात माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. व्हिडीओमध्ये राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी भाजपाचा पर्दाफाश करणार अशी धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ डीपफेक आहे आणि माजी शिक्षणमंत्र्यांनी भाजपाला कोणतीही धमकी दिलेली नाही.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर @sunil_saxena_yadav युजरने हा व्हायरल व्हिडीओ त्याच्या प्रोफाईलवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reels/DbUqSZLCHG5
इतर युजर्सदेखील असाच दावा करत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://www.instagram.com/reels/DbQJzaPzO-x
https://www.instagram.com/reels/DbQu-6tv7kV
तपास
आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपासाला सुरुवात केली. आम्ही कीफ्रेम्स क्रॉप केल्या आणि नंतर रिव्हर्स इमेज सर्च केले.
यावरून आम्हाला ९ दिवसांपेक्षा जास्त काळापूर्वी एनडीटीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला एक न्यूज रिपोर्ट मिळाला. व्हायरल व्हिडीओतील अँकर आणि मूळ व्हिडीओतील अँकर एकच व्यक्ती असल्याचे आढळून आले.
त्यानंतर आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले, यावरून आम्हाला माजी शिक्षणमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ मिळाला, जो दोन महिन्यांपूर्वी ANI ने पोस्ट केला होता.
हा व्हिडीओ नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावर आणि फेरपरीक्षेबाबत घेतलेल्या सविस्तर पत्रकार परिषदेतला होता. संपूर्ण व्हिडीओमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी कुठेही भाजपाचे पर्दाफाश करण्याची किंवा पक्षाला धमकी देण्याची कोणतीही भाषा वापरलेली नाही.
त्यानंतर आम्ही व्हिडीओमधील आवाज InVid टूलमधील Hiya Audio डिटेक्टरवर तपासला. या टूलमध्ये ९० टक्के व्हॉइस क्लोनिंग (आवाजाची नक्कल) असल्याचे आढळले.
निष्कर्ष
माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाजपाला कोणतीही धमकी दिलेली नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ डीपफेक आहे, त्यामुळे व्हायरल होणारा हा दावा खोटा आहे.
