‘ब्रेकिंग न्यूज’, ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘ब्रेकिंग न्यूज’ तमाम ढिंच्याक पूजाच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे, ती म्हणजे ढिंच्याक पूजाचे सगळे व्हिडिओ यूट्युबवरून हटवण्यात आलेत. तर ज्यांच्या ढिंच्याक पूजा आधीच फार ‘डोक्यात’ वगैरे जाते, त्यांच्यासाठी मात्र तिचे व्हिडिओ हटवणं म्हणजे आनंदवार्तेपेक्षा कमी नाही. असो…हा झाला चेष्टेचा भाग पण आपल्या बेसूर आवाजाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या ढिंच्याक पूजाचे यूट्युब व्हिडिओ हटवल्याने कालपासून सोशल मीडियावर बिचारी पूजा चांगलीच चर्चेत आली होती. तिचे यूट्युब चॅनेल लाखोंनी सबस्क्राईब केले आहे. तिच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंचे हिट्स आहेत तरी तिच्या चॅनेलवरून व्हिडिओ का काढण्यात आले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.. तर यामगे हात आहे तो ‘कथप्पा’चा. आता आपल्याला कटप्पा माहिती असेल पण हा कथप्पा कोण बरं? असाही प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. तर ढिच्यांक पूजाची रातोरात प्रसिद्धी हिरावून घेणाऱ्या माणसाचं पूर्ण नाव आहे कथप्पा सिंह. त्यांच्याच विनंतीवरून हे व्हिडिओ तिच्या यूट्युब चॅनेलवरून काढून टाकण्यात आलेत.

वाचा : ऐकलं का? १५ वर्षांच्या मुलाने केले ७3 वर्षांच्या वृद्धेशी लग्न

यूट्यूबच्या पॉलिसीनुसार जर तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये दिसत असाल तर तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती तुम्ही यूट्युबला करू शकता आणि याच पॉलिसीमुळे तिचे व्हिडिओ चॅनेलवरून हटवण्यात आलेत किंवा कथप्पाने कॉपीराईट इश्यूमुळे हे व्हिडिओ हटवण्याची मागणी केली असावी. पण काहीही कारण असले तरी युट्यूबरून तिचे १२ व्हिडिओ हटवण्यात आलेत. ‘दारू दारू’, ‘सेल्फि मेने लेली आज’ नंतर ढिंच्याक पूजाचं ‘दिलो का शूटर’ हे गाणं आलं होतं. पण या गाण्यामुळे ती चांगलीच वादात सापडली होती. हेल्मेट न घालता ती गाडी चालवताना या व्हिडिओत दिसत होती. तेव्हा हे गाणं सोशल मीडियावर व्हारयल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल तिच्यावर कारवाई केली होती.

वाचा : ‘ढिंच्याक पूजा’ची कमाई तुम्हाला माहितीय ?