Dhirendra Krishna Maharaj Mind Reading Video: बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या खूप चर्चेत आहेत. अलिकडेच ते प्रवचनासाठी नागपूर येथे आले असता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारिक शक्तींना आव्हान दिलं होतं. अनिसने धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या चमत्कारिक शक्ती सिद्ध करावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलीस एफआयआर दाखल करण्यात येईल, असंही समितीने म्हटलं होतं. धीरेंद्र महाराजांच्या चमत्कारिक चिठ्ठीचे प्रकरण काय आहे? व त्यावरून सध्या चर्चेत आलेल्या माईंड रीडरचा व्हिडीओ कसा नेटकऱ्यांना थक्क करत आहे हे आज आपण पाहणार आहोत.

हे ही वाचा<< चमत्कार करुन जोशीमठची दुभंगलेली जमीन जोडून दाखवा; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
rajesh tope devndra fadnavis
“एक टक्काही दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन”, राजेश टोपेंचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान; जरांगे पाटलांबाबत स्पष्ट केली भूमिका!

धीरेंद्र कृष्ण महाराज काय चमत्कार करतात?

धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्याकडे आलेली व्यक्ती कोणती समस्या घेऊन आली, हे त्या व्यक्तीने सांगण्याआधीच महाराज ती जाणतात. संबंधित अनोळखी व्यक्तीला त्यांच्या नावाने हाक मारतात. दरबारात येणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता आणि समस्या एका कागदावर लिहितात. तसेच समस्येचे समाधानदेखील त्यात नमूद करतात. त्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दलची माहितीही देतात असा लोकांचा समज आहे. त्यामुळे त्यांना चमत्कारी महाराज असेदेखील म्हटले जाते.

अलीकडेच ABP न्यूजच्या एका कार्यक्रमात अशाच चमत्कारिक चिट्ठीचा तपास करण्यासाठी माईंड रीडर सुहानी शाह यांना बोलाण्यात आले होते. यावेळी पत्रकार रुबिका लियाकत यांना सुहानीने प्रश्न विचारला व त्या उत्तर देण्याआधीच त्याचं उत्तर एका पाटीवर लिहून ठेवलं. जेव्हा रुबिका यांनी उत्तर दिलं आणि सुहानीने स्वतः लिहून ठेवलेलं उत्तर दाखवलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा<< विश्लेषण: ‘अंनिस’ने नागपूरमध्ये आक्षेप घेतलेले धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत कोण? हा वाद काय?

दरम्यान, धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या कथित दिव्यशक्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू आहे व त्यानुसार भविष्य सांगणे, चमत्कार करणे, दिव्यशक्तीने वस्तू ओळखण्याचा दावा करणे यावर बंदी आहे. आजार बरे करण्याचा दावा करणे आणि त्यातून पैसा कमावणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. धीरेंद्र महाराजांच्या माध्यमातून जनतेची फसवणूक होत आहे, त्यामुळे महाराजावर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.