Diamond Necklace in Trash : अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे महत्त्वाच्या वस्तू हरवतात. काहीवेळा एखादी महत्त्वाची वस्तू चुकून आपल्या हातून कचऱ्यात जाते. या वस्तू मिळाल्या नाही तर मोठे नुकसान सहन करावे लागते. तामिळनाडूच्या एका व्यक्तीबरोबर असंच काहीसं झालं. या व्यक्तीने चुकून सुमारे पाच लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार कचऱ्यात फेकून दिला, त्यानंतर त्याच्या कुटुंबाची झालेली बिकट अवस्था पाहण्यासारखी होती. पण, अखेर कुटुंबप्रमुखाने स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मदतीने कचऱ्यातील हार शोधून काढला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईतील विरुगम्बक्कमधील बीव्ही राजमन्नार रोड, विंडसर पार्क अपार्टमेंटमधील रहिवासी असलेल्या देवराज यांच्या घरी घडली. मुलीच्या लग्नासाठी पाच लाखांचा हिऱ्याचा नेकलेस खेरदी करण्यात आला होता. आईला हा हार आपल्या मुलीला भेट द्यायचा होता. मात्र, एक दिवस अचानक हा हिऱ्याचा हार गायब झाला, संपूर्ण घरामध्ये हार शोधला पण तो कुठेच सापडला नाही. अशा स्थितीत कदाचित हिऱ्याचा हार घराबाहेर कचऱ्यातून गेला असावा, असे कुटुंबीयांना वाटले, यासाठी देवराजने चेन्नई कॉर्पोरेशनमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या अर्बशेर या कंपनीशी संपर्क साधला. यानंतर स्वच्छता कर्मचारी आणि ट्रकचालक अँथनी सामी परिसरातील एका कचऱ्याच्या कुंडीजवळ पोहोचले आणि हिऱ्याचा हार शोधू लागले. More Stories On Viral Video : पावसात वेगाने बाईक चालवणाऱ्यांनो हा Video पाहाच; तुमची छोटीशी चूक कशी ठरू शकते जीवघेणी काही वेळ शोध घेतल्यानंतर अखेर हिऱ्यांचा हार सापडला आणि तो देवराज यांच्या हवाली करण्यात आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत स्वच्छता कर्मचारी अँथनी सामी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून हार शोधत असल्याचे दिसत आहे. शेवटी त्यांच्या मेहनतीने त्यांना हिऱ्यांचा हार परत मिळाला, आता अँथनी यांच्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे लोक खूप कौतुक करत आहेत. पण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मौल्यवान वस्तू फेकण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी मध्य प्रदेशातूूनही अशीच एक घटना समोर आली होती. एका कुटुंबाने बाहेर फिरायला जात असताना घरातील मौल्यवान सोन्याच्या वस्तू डस्टबिनमध्ये ठेवल्या. दरम्यान, त्यांच्या घरी राहायला आलेल्या एका पाहुण्याने कचरा समजून सफाई कर्मचाऱ्यांना दिला. पण, हे कुटुंबीय जेव्हा परत घरी आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. पण, कुटुंबीयांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने डम्पिंग ग्राऊंडमध्ये शोध घेतला असता मौल्यवान दागिने सापडले.