Teachers Day Special : आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त सर्वत्र ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात येतो. शिक्षकांविषयी आदर किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस असतो. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा देतात. भेटवस्तू देतात, पुष्पगु्च्छ देतात. काही शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी त्या दिवशी शिक्षक बनून वर्गात शिकवतात तर काही विद्यार्थी डान्स, गाणी किंवा कविता सादर करतात.
तुम्ही कधी शिक्षक दिनी शिक्षक झाला आहात का? जर हो, तर एक व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला शाळेची आठवण येईल. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला विद्यार्थी वर्गामध्ये शिकवत आहे. हा विद्यार्थी इतिहास शिकवत आहे. या व्हिडीओमध्ये तो शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवत असल्याचे दिसत आहे. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिकवत आहे आणि विद्यार्थी सुद्धा समोर पुस्तक घेऊन या शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्याचे नीट ऐकत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे शाळेतील दिवस आठवतील. काही लोकांना त्यांच्या शालेय जीवनातील मजेशीर गोष्टी आठवतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर विचारलेय, “तुम्ही कधी ५ सप्टेंबरला शिक्षक झाले का? असाल तर कमेंटमध्ये अनुभव सांगा.”
हेही वाचा : ‘शिखंडी!’ पुण्यात उभारले पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक, तुम्ही ऐकले का त्यांचे वादन, Viral Video एकदा पाहाच
पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लहान पणी शिक्षक शिक्षक खेळायची आता ३५ वर्ष शिक्षक म्हणूनच काम करतेय” तर एका युजरने लिहिलेय, “शाळेत असताना दरवर्षी शिक्षक व्हायचो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी शाळेत होतो तेव्हा चित्रकला विषय घेतला होता खुप छान वाटत होतं ” एक युजर लिहितो, ” खूप भारी अनुभव असायचा जेव्हा शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांची भूमिका घेऊन एक दिवस जगायला मिळायचा” अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.