Manike Mage Hithe: या गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलत का?

कोल्हापूरची आर्टिस्ट अपूर्वा नानिवडेकर सिंघ हिने या प्रसिद्ध गाण्याचं मराठी व्हर्जन गायले आहे.

manika hate in marathi
नेटीझन्सला हा मराठी अंदाज आवडला आहे (फोटो:@Apurva Naniwadekar Singh/YouTube)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर एक गाणे तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेकजण रिल्स बनवत आहेत.Manike Mage Hithe असे या गाण्याचे बोल आहेत. केवळ इन्स्टाग्रामवर नाही तर फेसबुक ट्वीटरसह संपूर्ण सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे युट्यूबरही हे गाणे ट्रेंडीगमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. हे गाणे एका मुलीने गायले आहे तिचे नाव आहे योहानी. योहानी हे गाणे गातानाचे काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झालं. आता हेच गाण मराठीत आलं आहे.

कोल्हापूरची आर्टिस्ट अपूर्वा नानिवडेकर सिंघ हिने या प्रसिद्ध गाण्याचं मराठी व्हर्जन गायले आहे. हे एक प्रकारचं फ्युजनचं आहे. २मिनिटे ४२ सेकंदाचं हे गाण आहे. या महिन्याच्या सुरुवातीला १ सप्टेंबर २०२१ला हे गाण अपूर्वा नानिवडेकर सिंघ या युट्युब चॅनेलवरून पोस्ट करण्यात आलं. आत्तापर्यंत जवळ जवळ ७ हजार लोकांनी या मराठी व्हर्जनला बघितलं आहे. तसेच अनेकांनी याला पसंतीही दर्शवली आहे.

नेटीझन्सने यावर मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अप्रतिम गायन, सर्वोत्तम रॅप आणि रॅपर शैली. आश्चर्यकारक कोलाब अगं रॉक ऑन केल्याबद्दल धन्यवाद” एका वापरकर्त्याने कमेंट केली. “खूप सुंदर, अद्वितीय ” अशी दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली. तर तिसऱ्या वापरकर्त्याने “अपूर्वा सिंग, गात रहा … चमकत रहा. सर्व खूप चांगले” अशी कमेंट केली.

तुम्हाला आवडलं हा हे मराठी व्हर्जन ?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Did you heard marathi version of manike mage hithe created by kolhapur artist ttg

फोटो गॅलरी