scorecardresearch

Premium

सुट्टे नाहीत? मग Gpay करा; आता भिकारीही झाले डिजिटल, मुलीचा जुगाड तुफान व्हायरल

डिजिटल भिकारी; क्युआर कोड घेऊन मागतेय भिक, Video तुफान व्हायरल

digital beggar viral video
आता भिकारीही झाले डिजिटल

तुम्हाला रस्त्यावर, ट्रेनमध्ये, चौकाचौकात भिकारी भिक मागताना दिसतात. मंदिराच्या बाहेर किंवा दुकानांबाहेर भिकारी हमखास धडकतील. आजकाल तर भिकारीही वेगवेगळ्या स्टाईलने भिक मागतात. अनेक लोक त्यांना पैसै देतात तर काहीजण सुट्टे पैसै नसल्याचं कारण सांगून त्यांना पळवतात. मात्र आता भिकारीही हुशार झाले आहेत. पैसै मिळवण्यासाठी नवनव्या ट्रिक ते शोधून काढतात. अशातच एका ‘डिजिटल भिकारी’चा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भिकारी हातात क्यूआर कोड घेऊन लोकांना भीक मागत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक लहान मुलगी रस्त्यावर भीक मागत आहे. भीक मागत असताना अनेक जण आमच्याकडे सुट्टे पैसे नाहीत सांगतात. सुट्टे पैसे नाहीत म्हणून भीक देत नाहीत. त्यामुळे या मुलीने असं करणाऱ्या लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी थेट क्यूआरकोड आणला आहे.

taapsee-pannu-argument-with-paparazzi
“बाजूला व्हा नाहीतर…”; पापराझींवर पुन्हा चिडली तापसी पन्नू, व्हिडीओ व्हायरलॉ
amir khan new look
Video कुरळे केस, डोळ्यांना चष्मा अन्… मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा नवीन लूक व्हायरल, नेटकरी म्हणाले…
how to make brown bread in factory
तुम्हीही हेल्दी समजून “ब्राउन ब्रेड” खाता? ‘हा’ VIDEO पाहाल तर झोप उडेल…नागरिकही संतापले
tu tewha tashi
Video: “आकाशात असतात सन, स्टार्स आणि मून…”, ‘तू तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याचा होणाऱ्या बायकोसाठी भन्नाट उखाणा

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जम्मू-काश्मीरमध्ये लेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

मुलीच्या हातातला क्यूआर कोड पाहून ही मुलं चकित होतात. @sutta_gram नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ देखील एडिट करण्यात आला आहे. यामध्ये मोदी त्यांची डिजिटल इंडियाची संकल्पना सांगत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digital beggar viral video girl begging on road with qr code scanner video viral srk

First published on: 23-09-2023 at 17:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×