कॅमेरा आणि व्हॉट्सअ‍ॅप असलेल्या लँडलाइनचे फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लँडलाइन फोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

tablet-landphone
कॅमेरा आणि व्हॉट्सअ‍ॅप असलेल्या लँडलाइनचे फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले… (Photo- Twitter)

स्मार्टफोन हातात येण्यापूर्वी लँडलाइन प्रत्येक घराची ओळख होती. लँडलाइन फोन घरी असणं प्रतिष्ठेचं समजलं जात होतं. मात्र काळाच्या ओघात लँडलाइन जागा स्मार्टफोनने घेतली आणि लँडलाइन दिसेनास झाला. आता क्वचित घरात लँडलाइन फोन पाहायला मिळत असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लँडलाइन फोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लँडलाइन नव्या ढंगात नव्या रुपात पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत. लँडलाइनमध्ये छोटी स्क्रिन दिली असून त्यात स्मार्टफोनसारखे अॅप्लिकेशन दिसत आहेत.

व्हायरल फोटो पाहून काही जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही जण हा लँडलाइन कुठे मिळेल म्हणून विचारणा करत आहेत. हे फोटो जर्मनीचा ट्विटर युजर्स निकी टोनस्काय याच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत.

टॅबलेट आणि लँडलाइन फोन एकत्रित केल्यावर डिजिटल लँडलाइन तयार झाला आहे. या लँडलाइनमध्ये अ‍ॅप्ससह अनेक फिचर दिसत आहेत. त्यामुळे फोटो जरी व्हायरल असले तरी संकल्पना चांगली असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या फोनला KTS(3C)बोललं जातं. बॅटरी आणि सिम कार्ड स्लॉट असलेला एक वायरलेस टॅबलेट किंवा लँडलाइन आहे.

व्हायरल फोटो पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. निकीने ट्विट केलेले फोटो आतापर्यंत १ लाख ४८ हजार लोकांनी रिट्वीट केला आहे. तर १.१ मिलियन लाइक्स आणि ३ हजाराहून अधिक जणांनी कमेंट्स केल्या आहेत.

भविष्यात लोकांच्या घरी डिजिटल लँडलाईन पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. कारण कमेंट्स आणि उत्सुकता पाहता नव्या रुपातील डिजिटल लँडलाइनची क्रेझ कायम असल्याचं दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Digital landline photo viral on social media rmt

Next Story
दाढी करण्यासाठी सलूनमध्ये पोहोचले हे स्टायलिश माकड; VIRAL VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी