Digital Wills Online Assets: पूर्वी मृत्यूपत्र करताना लोक फक्त घर, जमीन आणि कार यासारख्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा विचार करत असत. मात्र काळ बदलला तसतसं लोक डिजिटल मालमत्तेलाही महत्त्व देऊ लागले. यामध्ये तुमचे सोशल मिडिया अकाउंट्स, ई-बुक्स, शेअर्स, डिजिटल वॉलेट्स आणि क्रिप्टोकरन्सी यांचा समावेश आहे. त्यांची सुरक्षितता आणि योग्य हस्तांतरण आता आवश्यक आहे.

स्मार्टफोन ठरत आहे मास्टर-की

स्मार्टफोन आपल्या जीवनाची मास्टर-की बनले आहेत. बँकिंग अॅप्स, कुटुंबाचे फोटो, टॅक्स रेकॉर्ड्स हे सर्वकाही तुमच्या फोनमध्ये असते. जर फोन लॉक असेल आणि कुटुंबातील कोणालाही पासवर्ड, फेस लॉक किंवा पॅटर्न माहीत नसेल, तर गरज पडल्यास पैसे किंवा महत्त्वाचा डेटा अॅक्सेस करणे कठीण होऊन जाते. म्हणून तुमच्या डिजिटल खात्यांसाठी नॉमिनी ठेवा आणि त्यांना पासवर्ड अॅक्सेस असल्याची खात्री करा.

यामध्ये मदत करण्यासाठी तुम्ही पासवर्ड डायरी ठेवू शकता किंवा पासकोडसाठी आपत्कालीन फोल्डर तयार करू शकता. आझकाल अनेक डिजिटल पासवर्ड आपत्कालीन संपर्क सेट करण्याचा पर्याय देखील देतात. जर तुम्ही तुमचे खाते दीर्घकाळ वापरत नसाल, तर विश्वासू व्यक्तीला प्रवेश मिळू शकतो.

आता फक्त बँक खातीच नाहीतर सूपीआय लिंक्ड वॉलेट्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि अन्न आणि प्रवासाचे अॅप्समधील रोख शिल्लक देखील मालमत्ता मानली जाते. प्रत्येक डिजिटल वॉलेट आणि फिनटेक अॅपचे रेकॉर्ड ठेवा आणि नॉमिनी अपडेट आहे ते तपासा. यामुळे पैसे कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची खात्री होईल.

ईमेल आणि क्लाउड स्टोरेज सुरक्षित करणेदेखील महत्त्वाचे आहे. गुगल इनअॅक्टिव्ह अकाउंट मॅनेजर सारखी वैशिष्ट्ये देते आणि अॅपल सुद्धा लेगसी कॉन्टॅक्ट्स देते. आता शेअर्सही पूर्णपणे डिमटेरियलाइज्ड झाले आहेत आणि पेपर शेअर्स सर्टिफिकेटही जुने झाले आहेत. म्हणून तुमच्या डिमॅट खआत्यात फायदेशीर नॉमिनी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल चलनाच्या बाबी संवेदनशील असतात. बँक खाते व्यवस्थापक मदत करू शकतात, मात्र क्रिप्टो वॉलेटमध्ये व्यवस्थापक नसतो. जर तुम्ही तुमची खाजगी की किंवा पासवर्ड गमावला तर तुमचे पैसे कायमचे जाऊ शकतात. न्यायालये किंवा तांत्रिक तज्ज्ञ ते पुनर्संचयित करू शकत नाहीत.

दरम्यान, फक्त इच्छापत्र तयार करणे पुरेसे नाही. तुमच्या डिजिटल मालमत्तेचे सुरक्षित आणि अचूक हस्तांतरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या डिजिटल जगात तुमच्या कुटुंबाचे आणि तुमच्या कठोर परिश्रमाचे रक्षण करण्यासाठी हे आवश्यक आहेत.