Dirty Ice Cream Making Video : आईस्क्रीम हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. लहान मुले असोत की वयस्कर व्यक्ती, सर्वांनाच आईस्क्रीम खायला आवडते. लोक केवळ उन्हाळ्यात नाही तर कोणत्याही ऋतूत आवडीने आईस्क्रीम खातात. त्यामुळे बाजारातही अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सची आईस्क्रीम पाहायला मिळतात. विशेष म्हणजे अगदी पाच रुपयांपासून ते ५००, १००० रुपयांपर्यंत आईस्क्रीम मिळतात. पण, अनेक जण स्वस्तातील पाच रुपयांचे आईस्क्रीम खाणे पसंत करतात. पण, हे पाच रुपयांना मिळणारे आईस्क्रीम कशाप्रकारे बनवले जाते हे जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला पुन्हा आईस्क्रीम खाण्याची इच्छा होणार नाही. सध्या सोशल मीडियावर आईस्क्रीम बनवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती व्यक्ती इतक्या किळसवाण्या प्रकारे हाताने सर्व आईस्क्रीमचे कप भरतेय की, हा व्हिडीओ पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.

आईस्क्रीम बनवण्याची गलिच्छ पद्धत, पाहा व्हिडीओ

यापूर्वीदेखील अगदी गलिच्छ पद्धतीने आईस्क्रीम बनवून ते लोकांना विकल्याचे प्रकार समोर आले आहेत. इतकेच काय तर एका प्रकरणात तर चक्क आईस्क्रीममध्ये तुटलेले मानवी बोट आढळून आले होते, ज्यानंतर वारंवार अशा घटना समोर आल्या आहेत. अशात आता आईस्क्रीमचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती आईस्क्रीम कपमध्ये अतिशय गलिच्छपणे आईस्क्रीम भरताना दिसतोय.

Pune shop owner advertise for Renting shop in Puneri way puneri poster goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गाळा भाड्यानं देण्यासाठी दुकानाबाहेर लावली जाहिरात; वाचून पोट धरुन हसाल
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
Two girl students dancing on aaj ki raat song went viral on social media from neet coaching center
‘आज की रात…’, भर वर्गात दोन विद्यार्थींनींचा ‘असा’ डान्स पाहून म्हणाल, कहरच…, पाहा VIRAL VIDEO
Puneri poster viral
VIDEO: “पुणेकरांचा नाद नाय बुवा” गाव विकणे आहे म्हणत पुण्यात रस्त्यावर लावला बॅनर; कारण वाचून लावाल डोक्याला हात
Boy hold funny poster at lalbaug mumbai video goes viral on social Media
“फक्त गर्दीत हात धरणारी नको…” लालबागमध्ये तरुणाची पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या; असं लिहलंय तरी काय? पाहा VIDEO
Viral video sky hunters fight with water Monster eagles intelligence pales in front of crocodile
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” मगरीने गरुडाला इंगा दाखवत हरलेला डाव कसा जिंकला एकदा पाहाच
dirty ice cream making viral video
गलिच्छ पद्धतीने आईस्क्रीम बनवतानाच व्हिडीओ (photo – sr__chhotu___c29’s / insta)

हेही वाचा – मुंबईतील रेल्वेस्थानकावर भेळ खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा विचार कराल

हातात कोणतेही फूड सेफ्टी ग्लोज न घालता बनवतोय आईस्क्रीम

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच रुपयांना मिळणाऱ्या आईस्क्रीमच्या कपमध्ये एक व्यक्ती मेल्ट झालेली क्रीम चक्क हाताने भरतेय. विशेष म्हणजे क्रीम ठेवण्यासाठी चक्क कलरची बादली वापरण्यात आली आहे. यात ठेवलेली क्रीम ती व्यक्ती एक एक करून कपमध्ये भरतेय. धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी त्याने ना हातात कोणते फूड सेफ्टी ग्लोज घातलेत ना काही.. अगदी वाईटप्रकारे तो आईस्क्रीम कप भरण्याचे काम करतोय, इतकेच नाही तर आजूबाजूची जागादेखील अतिशय घाणेरडी, अस्वच्छ दिसतेय. या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये त्याने लिहिलेय की, आईस्क्रीम कपमध्ये भरण्याची मशीन बंद पडल्याने त्याला अशाप्रकारे हाताने आईस्क्रीम भरावे लागतेय. यावरून लोकांच्या आरोग्याशी कशाप्रकारे खेळ सुरू आहे हे दिसतेय.

पाच रुपयांना मिळणारे कप आईस्क्रीम खाताना जरा विचार करा

अशा प्रकारे अगदी अस्वच्छपणे बनविलेले आईस्क्रीम तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते, त्यामुळे यापुढे दुकानात पाच रुपयांना मिळणारे कप आईस्क्रीम खाताना जरा विचार करा.

किळसवाण्या प्रकाराचा हा व्हिडीओ sr_chhotu__c29 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, व्हिडीओचे कमेंट सेक्शन ऑफ करून ठेवण्यात आले आहे.