Dirty Lemon Juice Video : कोणत्याही शहरात फिरताना एक तरी लिंबू सरबताचा स्टॉल दिसतोच. घरातून बाहेर पडल्यानंतर ट्रेन, बसने प्रवास करून कामावर पोहोचेपर्यंत खूप दमायला होते अन् अंग घामानं भिजून जातं. अशा वेळी थंडाव्यासाठी अनेक जण रेल्वेस्थानकाबाहेरील गारेगार लिंबू सरबताचा पितात. भरउन्हातून चालताना घशाला कोरड पडलेली असताना नाक्यावर लिंबू सरबतवाला दिसला, तर मिळणारा आनंद हा काही औरच असतो ना! पण, खरं सांगायचं झालं, तर रस्त्यावर विकलं जाणारं लिंबूपाणी कितीही चविष्ट असलं तरी ते किती स्वच्छ असेल ते सांगता येत नाही. मग असं स्वच्छतेबाबत शंकास्पद असलेलं लिंबूपाणी पिऊन तुम्ही कदाचित आजारीदेखील पडू शकता. तुम्हाला हे पटत नसेल, तर हा लिंबू सरबताचा किसळवाणा व्हिडीओ पाहाच; जो पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच रस्त्यावर लिंबू पाणी पिणार नाहीत.
मुंबईत फिरताना तुम्हाला रेल्वेस्थानकावर, रेल्वेस्थानकाबाहेर आणि नाक्यावर ठिकठिकाणी लिंबू सरबताचे स्टॉल दिसून येतात. कारण- मुंबईत प्रवास करताना दमायलाच इतकं होतं की, घशाला कोरड पडते. अशा वेळी अनेकजण अशा स्टॉलवर लिंबू सरबत पिताना दिसतात. पण, तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी काळजी आहे ना; मग हा व्हिडीओ एकदा तुम्ही पाहा, ज्यात लिंबू सरबतवाला तुम्हाला किती घाणेरड्या पाण्यात लिंबू पाणी बनवतो हे दिसेल.
लिंबू पाण्यात पडल्या माश्या अन् किडे
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती लिंबू पाणी विकतेय. यावेळी एक तरुण लिंबू सरबतवाल्यानं ज्या भांड्यात लिंबूपाणी बनवून ठेवलं आहे, ते आतून किती अस्वच्छ आहे ते सांगत त्यासंबंधीचा व्हिडीओ शूट करतोय. तुम्ही बघू शकता की, लिंबूपाणी ठेवलेल्या भांड्याच्या आत अक्षरश: असंख्य माश्या पडल्यात. धक्कादायक बाब म्हणजे अतिशय अस्वच्छ, गढूळ अशा या लिंबू सरबतात चक्क पांढऱ्या रंगाचे किडेदेखील वळवळताना दिसत आहेत. खूप दिवस पाणी साठून राहिल्यानंतर त्यात ज्या प्रकारे किडे पडतात, अगदी तसेच किडे या लिंबू सरबतात दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा की, रस्त्यावर आता लिंबू सरबत प्यायचे की नाही ते. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Read More Trending News : ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”
आरोग्याची काळजी असेल तर ‘हा’ व्हिडीओ पाहाच
“लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लिंबू सरबतवाल्याविरोधात कारवाई करा”, युजर्सची मागणी
अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. @danny_dance9999 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ चंदिगडमधील असल्याचे सांगितलेले आहे. अनेकांनी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरनं लिहिलंय की, अन्न सुरक्षा विभाग काय झोपा काढतंय का? दुसऱ्या एकानं मागणी केली की, संबंधित लिंबू सरबतवाल्यावर कारवाई झाली पाहिजे. हा लोकांच्या आरोग्याशी अक्षरश: खेळतोय. आणखी एकानं म्हटलंय की, त्यापेक्षा लोकांनी आता बाहेरचं खाणं बंद केलं पाहिजे. अशा प्रकारे लोक व्हिडीओ पाहिल्यानंतर तीव्र शब्दांत संताप व्यक्त करीत आहेत.