गणेशोत्सव म्हटलं की, ढोल ताशा वादन हे ठरलेलंच असते. उत्तम वादन करणारे अनेक पथक आपल्याकडे आहेत. दरवर्षी गणेशोत्सवासाठी अनेक तरुण-तरुणी ढोल ताशाचे वादन सादर करतात. गणेशोत्सवाच्या २-३ महिन्याआधीपासूनच ढोल वादनाच्या तालिमीची सुरुवात होते. कित्येकजण नोकरी, घर -संसार सांभाळून ढोल वादनासाठी वेळ काढतात. हे सर्व करताना त्यांची प्रत्येकाची ओढताण होते पण तरीही कोणीही हार मानत नाही. सध्या अशाच एका तरुणीचा ढोल वादनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही तिच्या जिद्दीला सलाम कराल.
सोशल मीडियावर अनेक ढोल वादनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध होत असाल. पण सध्या पुण्यातील एका तरुणीच्या ढोलवादनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही तरुणी एकाच हाताने ढोल वादन करत आहे. आसपासचे लोकही तिच्याकडे कौतूकाने पाहत आहे. दिव्यांग असूनही तरुणीने ढोल वादनाची जिद्द सोडली नाही. वादन करताना तरुणीच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत आहे. तिच्या आसपासचे लोक तिच्याकडे कौतूकाने पाहताना दिसत आहे.
हेही वाचा – ”लग्नासाठी मुलगी पाहिजे पण आई…” ढोलवादकाने लग्नासाठी हटके स्टाइलमध्ये घातली मागणी पण, अट एकच…; VIDEO तुफान व्हायरल
हा व्हिडीओ vivekbhaiya_kolhe या इंस्टाग्राम अकांउटवर शेअर केलेला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”मनात जिद्द असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही…” लोकांना हा व्हिडीओ आवडला असून अनेक जण तिच्या जिद्दीचे कौतूक करत आहे. लोकांनी व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, ”माझा ग्रँड सलाम ताई तुम्हाला .. पण हे सर्व करत असताना स्वत:ची काळजी घ्या ” आणखी एकाने लिहिले की, ”ताई तुझं जेवढे कौतुक करावे तेवे कमी आहे” तर तिसऱ्याने लिहिले , ”ताई तुला मानाचा मुजरा”
तरुणीची जिद्द पाहून सर्वांना प्रेरणा मिळते आहे.