Viral Chips Factory Video : बाजारात मिळणारे चिप्स, वेफर्स सारखे पदार्थ आपल्यापैकी अनेकजण खातात. हे पदार्थ खरेदी करताना आणि खाताना आपण उत्पदकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो पण आपली फसवणूक होत आहे असा विचार तुमच्या मनात कधी येतो का? बाजारात मिळणारे हे पॅकबंद पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे? ते कसे बनले जातात याचा विचार करतो का? हो नक्कीच आपल्यापैकी अनेकजण लेबल वाचत असतील, किती कॅलरीज आहेत, किती फॅट्स आहेत याचे काळजीपूर्वक वाचत असतील पण स्वच्छतेचे काय? कोणत्याही पदार्थ स्वच्छते नियम पाळून केला आहे हे दर्शवणारे कोणतेही चिन्ह नसते आणि असले तरी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा का? तुम्हाला वाटेल एका चिप्ससाठी एवढा विचार कोण करेल पण व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हाच विचार करेल.
सोशल मीडियावर सध्या एक अत्यंत किळसवाणा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका चिप्सच्या फॅक्टरीमधील आहे जिथे अत्यंत अस्वच्छता दिसत आहे. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने चिप्स बनवले जात आहेत ज्यामुळे बाजारात मिळणाऱ्या अन्न पदार्थांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कहर म्हणजे व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क अर्धनग्न अवस्थेत जिथे चिप्स धुतले जात असलेल्या त्या पाण्यात उतरलेला दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिप्सच्या फॅक्टरीमधील आहे जिथे बटाट्याचे चिप्स तयार केले जात आहे. बटाट्याचे काप एका मोठ्या हौदासारख्या ठिकाणी पाण्यात धुतले जात आहे. पण एक व्यक्ती थेट त्या पाण्यात उतरेला दिसत आहे तेही फक्त अंतर्गवस्त्र परिधान करुन उतरला आहे. अर्धनग्न अवस्थेतच हातात कोणतेही ग्लव्ह्ज न परिधान करताच तो चिप्स पुढे ढकलत आहे. त्याच हौदाच्या कठड्यावर एक व्यक्ती चक्क चप्पल घालून उभा आहे. हे किळसवाणे दृश्य पाहून नेटकऱ्यांचा संताप होत आहे.
व्हिडीओ इंस्टाग्राम, रेडिट आणि एक्सवर व्हायरल होत आहे. एक्सवर @ThamizhTharmar या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करत एकाने लिहिले की, किळसवाणे! पाण्याच्या टाकीत फक्त अंतर्वस्त्र घालून उभा असलेला माणूस, आपल्या शरीराने बटाटे साफ करत आहे. घाणेरड्या फरशीवर अनवाणी कामगार कापलेले बटाटे तुडवत आहेत. त्तर भारतातील काही कारखान्यांमध्ये असे स्नॅक्स बनवले जातात का? FSSAIIndia — हे बंद करा!”
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. काहीं कंपनीचा विक्री परवाना रद्द करण्याची मागणी केली. व्हिडीओ नक्की कुठे शुट केला आहे याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही.
