scorecardresearch

करोना वॉरियर्सवर केलेली Amazon ची ही दिवाळी जाहिरात होतेय VIRAL; तुम्ही ही व्हाल भावूक

‘उठा.. उठा, दिवाळी आली’ची जाहिरात तुम्हाला आठवतेय का? दिवाळी आली की या जाहिरातीच चर्चा सोशल मीडियावर रंगत असते. पण यंदाच्या दिवाळीत या जाहिरातीची जागा एका नव्या जाहिरातीने घेतलीय. ही जाहिरात पाहून तुमचे डोळे पाणावतील.

करोना वॉरियर्सवर केलेली Amazon ची ही दिवाळी जाहिरात होतेय VIRAL; तुम्ही ही व्हाल भावूक
(Photo: Facebook/ Amazon India )

दरवर्षी फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई, फराळाची रेलचेल आणि शुभेच्छांचा पाऊस असणारी दिवाळी गेले काही वर्षे करोनाच्या सावटाखालीच साजरी झाली. दिव्यांची रोषणाई झगमगलीच नाही आणि फटाक्यांच्या आतषबाजीनेही उसंतच घेतली. एकमेकांना शुभेच्छा देण्याऐवजी एकमेकांच्या घरात आढळून आलेल्या करोना रूग्णांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना होऊ लागल्या. करोनाचा अंधार आता हळूहळू दूर होऊ लागलाय. करोनाशी दोन हात करून आपलं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून करोना वॉरियर्स घरापासून दूर राहत करोना रुग्णांची सेवा करत होते. त्यांच्या त्यागामुळे आज दोन वर्षानंतर लोक आपल्या घरी जवळच्या माणसांसोबत दिवाळी साजरा करत आहेत. आनंदाच्या प्रकाशाचा असलेला हा उत्सव या स्पेशल कुटुंबासोबत साजरा करण्याचं आवाहन करणारी अ‍ॅमेझॉनची जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलीय. एवढंच नाहीतर भावूक करणाऱ्या या जाहिरातीनं हजारो लोकांची मनं जिंकली आहे. लोकांना ही जाहिरात खूपच आवडली आहे. सोशल मीडियावर इमोशनल कमेंट्सचा अक्षरश: महापूर आला आहे. तुम्ही ही जाहिरात पाहिली नसेल तर एकदा ही जाहीरात नक्की पाहा…तुम्ही देखील भावूक झाल्याशिवाय राहणार नाहीत.

दिवाळीच्या काही दिवस आधी दरवाजावर टकटक वाजत, ‘उठा.. उठा, दिवाळी आली’ची साद ऐकू येते. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर ‘अलार्म काका’ दर वर्षीप्रमाणे दिवाळी जवळ आल्याची आठवण करून देतात. दिवाळी आली की या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर रंगतेच. पण यंदाच्या दिवाळीत ही जागा एका नव्या जाहिरातीने घेतलीय. दिवाळीच्या काही दिवस आधीच Amazon India ने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात आता लोकांना खूपच भावली आहे. Amazon India ने फेसबुकवर ही जाहिरात शेअर केली असून पडद्यामागचे खरे करोना वॉरियर्ससोबत दिवाळी साजरा करण्याचा अनोखा संदेश देण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल तर येईलच पण सोबतच तुमचे डोळेही पाणावतील.

काही लोक #SpecialFamily असतात आणि या वर्षी त्यांना #deliverthelove करायला विसरू नका. आमच्याकडून ही एक हृदयस्पर्शी कथा आहे! कमेंट्स सेक्शनमध्ये आम्हाला तुमच्या #SpecialFamily बद्दल सांगा,” अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. ही जाहिरात त्यांनी करोना योद्ध्यांना समर्पित केली आहे. दिवाळीची इतकी सुंदर जाहिरात तुम्ही कधीच पाहिली नसेल.

इथे पाहा ही जाहिरात:

https://fb.watch/8-qq2gqaMQ/

अ‍ॅमेझॉन इंडियाने हा व्हिडीओ २९ ऑक्टोबर रोजी शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होण्यास सुरूवात झाली. आतापर्यंत ९.६ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. ही जाहिरात पाहून अनेक जण प्रेरित झाले आहेत. यानंतर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावर नेटिझन्स सुद्धा या जाहिरातीचं कौतुक करत आहेत. “उत्कृष्ट जाहिरात…”, “कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबियांकडून मदत मिळत नाही, पण रक्ताचं नातं नसलेल्या व्यक्ती आपल्या संकटात मदतीला धावून येतात” यासारख्या अनेक प्रतिक्रिया युजर्स देताना दिसून येत आहेत. आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं, “खरंच, हेच बंध आहेत जे आपल्याला जपायला हवेत,”. तिसऱ्या युजरने लिहिलं, “खरोखर सुंदर संदेश,”. चौथ्या युजरने लिहिलं, “सुंदर आणि भावनिक….खूप छान,”. सध्या हा व्हिडिओ लोकांना भावुक करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या