Diwali Viral Video: भारतीयांसाठी दिवाळी हा सण खूप महत्वाचा मानला जातो. त्यामुळेच तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरादेखील केला जातो. या सणाची लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतात. परंतु पूर्वीच्या दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत आणि आताच्या पद्धतीने अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. पूर्वी घरोघरी महिला फराळ बनवायच्या. पण, आता कामाच्या व्यापामुळे प्रत्येकाला घरी फराळ बनवणं शक्य होत नाही. शिवाय पूर्वी खेडेगावांमध्ये लहान मुलं एकत्र येऊन किल्ला बनवायचे. पण, आता शहरांमध्ये हे सुख सर्वांनाच अनुभवता येत नाही. आता असाच एका गावातील व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यात लहान मुलं किल्ला बनवताना दिसत आहेत. या व्हिडीओ पाहून नेटकरीही विविध कमेंट्स करत आहेत.
काळ बदलला तशी माणसं, त्यांचे स्वभाव, पेहराव आणि सण साजरे करण्याची पद्धतही मोठ्या प्रमाणात बदलेली पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या काळात अनेकजण सण फक्त सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून शेअर करण्यासाठी आणि त्यातून व्ह्यूज, लाइक्स मिळवण्यासाठी साजरा करतात. पण, पूर्वीचे लोक प्रत्येक सण आनंदासाठी साजरे करायचे. पण, आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओनेही अनेकांचे मन जिंकले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गावामध्ये काही मुला-मुलींनी मिळून किल्ला बनवला असून यावेळी ते किल्ल्याच्या आसपासच्या परिसराची साफसफाई करत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “करोडो रुपये दिले तरी असले बालपणीचे दिवस येणार नाही”, असे लिहिले आहे.
हेही वाचा: पाण्यात पडलेल्या मालकाला वाचवण्यासाठी श्वानाने मारली उडी; VIDEO पाहून व्हाल अवाक्
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवरील @maharashtra_travelling07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास दोन लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शिवाजी महाराजांशिवाय दिवाळी नाही देवा”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आयुष्यातील सोनेरी क्षण” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “जय शिवराय”