ओडिशातील बालासोर येथील पोलिसांना एक अभूतपूर्व केस सापडली. एका व्यक्तीने लग्नादरम्यान मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याबद्दल शेजाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली आणि आरोप केला की त्याच्या ब्रॉयलर फार्ममध्ये ६३ कोंबड्यांचा मृत्यू झाला.निलागिरी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, पोल्ट्री फार्मचे मालक रणजित परीडा, कंडागराडी गावचे रहिवासी, यांनी दावा केला आहे की त्यांच्या कोंबड्यांचा मृत्यू त्यांच्या शेजारी रामचंद्र परीडा यांच्या लग्नाच्या मिरवणुकीत डीजेने वाजवलेल्या वाजवलेल्या संगीतामुळे संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

रणजीतच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री ११.३० वाजता डीजे बँडसह लग्नाची मिरवणूक त्यांच्या शेताच्या समोरून गेली. डीजे त्याच्या शेताजवळ आल्यावर कोंबड्या विचित्र वागू लागल्या, काहींनी उड्या मारायला सुरुवात केली. रणजीतने डीजेला आवाज कमी करण्याची वारंवार विनंती करूनही, ‘कथितपणे ‘कान फुटणारे संगीत” वाजले, परिणामी ६३ कोंबड्यांचा मृत्यू झाला.

( हे ही वाचा: Viral Video: आफ्रिकन सिंहाच्या अगदी जवळ पोहोचली व्यक्ती अन् … )

पोल्ट्री फार्मच्या मालकाने कोंबड्या पडल्यानंतर त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पशुवैद्यकाकडे तपासणी केली, त्यांनी निदान केले की मोठ्या आवाजामुळे पक्ष्यांना धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

( हे ही वाचा: …अन् लग्नाचा लेहेंगा घालूनचं वधू पोहचली परीक्षा केंद्रावर; व्हिडीओ व्हायरल )

२२ वर्षीय रणजीत, अभियांत्रिकी पदवीधर, ज्याला नोकरी मिळू शकली नाही, त्याने २०१९ मध्ये निलागिरीतील एका सहकारी बँकेतून दोन लाख रुपयांचे कर्ज घेऊन ब्रॉयलर फार्म सुरू केला. सुरुवातीला त्यांनी शेजारी असलेल्या रामचंद्र यांच्याकडे नुकसान भरपाई मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्यांनी नकार दिला. दुसरा कोणताही पर्याय नसताना रणजीतने रामचंद्र विरुद्ध निलगिरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि आरोप केला की मोठ्या आवाजातील संगीत आणि फटाक्यांच्या धक्क्याने कोंबड्या मरण पावल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dj music killed my 63 hens the police also went on a rampage due to the complaint of the poultry owner ttg
First published on: 24-11-2021 at 12:44 IST