Do Mosquitoes Bite Snakes: जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सिंह, वाघ, साप यांसारखे धोकादायक प्राणी उभे राहतात. पण, या मोठ्या प्राण्यांसोबतच जंगलात अगदी छोट्या जीवांचाही वावर असतो आणि त्यात सर्वात त्रासदायक नाव म्हणजे डास. आपण जाणतो की डास माणसाचं रक्त शोषतात आणि अनेक आजार पसरवतात. पण कधी विचार केलात का, हेच डास सापासारख्या भयानक प्राण्यालाही चावतात का?

याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक थक्क करणारा क्षण अलीकडेच एका वन्यजीव छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात कैद केला आहे… आणि तो पाहून सर्वजण चकित झाले आहेत!

फोटोमध्ये काय दिसलं?

या दुर्मीळ छायाचित्रात एक डास शांतपणे सापाच्या डोक्यावर बसलेला दिसतो. त्याने आपली बारीक सूंड सापाच्या त्वचेत खुपसली आहे आणि तो निवांतपणे रक्त शोषत आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप पूर्णपणे शांत;
ना हालचाल, ना प्रतिक्रिया… जणू काही घडलंच नाही!

हा फोटो पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले, डास सापाचं रक्त खरंच पितात का? आणि साप त्याला थांबवत का नाही?

डास खरंच सापाचं रक्त पितात का?

वैज्ञानिकांच्या मते, डास फक्त माणसं किंवा पक्ष्यांनाच नाही तर सरपटणाऱ्या प्राण्यांनाही (रेप्टाइल्स) चावतात. सापाच्या त्वचेत सूक्ष्म छिद्र असतात, जिथे डास सहजपणे आपली सूंड घुसवू शकतो.

जगभरातील अनेक छायाचित्रकारांनी अशा घटना टिपल्या आहेत. मध्य अमेरिकेत आढळणाऱ्या अत्यंत विषारी सापावरसुद्धा डास रक्त शोषताना दिसला आहे.

विशेष म्हणजे, सापाचं विष डासाला हानी पोहोचवत नाही, कारण तो केवळ थोडं रक्त शोषून उडून जातो.

मग साप काहीच प्रतिक्रिया का देत नाही?

हा प्रश्न सगळ्यांना पडतो, इतका धोकादायक साप आणि एवढासा डास… तरी साप शांत का?

यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ऊर्जेची बचत.
साप हे थंड रक्ताचे प्राणी (cold-blooded) असतात, ते प्रत्येक छोट्या गोष्टीवर ऊर्जा खर्च करत नाहीत.

डासाचा चावा इतका हलका असतो की अनेकदा सापाला तो जाणवतही नाही.
कधी कधी साप विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो, त्यामुळे तो त्या छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो.

वैज्ञानिकांसाठी महत्त्वाचं निरीक्षण

ही घटना फक्त आश्चर्यकारक नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे.
डास विविध प्राण्यांचं रक्त शोषतात, त्यामुळे काही वेळा ते विषाणू वाहक (virus carriers) ठरू शकतात.

याच कारणामुळे काही संशोधक डासांच्या मदतीने सापांच्या हालचालींचा अभ्यास करतात. अमेरिकेतील काही भागांत तर आक्रमक सापांचा मागोवा घेण्यासाठी डासांचा वापरही केला जातो.

शेवटी… एक धक्कादायक सत्य

आपण ज्याला जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानतो, तो साप…
आणि त्यालाच त्रास देणारा एक छोटासा डास!

येथे पाहा व्हिडीओ

निसर्ग खरंच किती विलक्षण आहे, याची जाणीव करून देणारा हा प्रसंग आहे.

पुढच्या वेळी डास चावला तर लक्षात ठेवा, तो फक्त तुम्हालाच नाही तर सापालाही सोडत नाही!