Viral Video : सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहे. अशावेळी पाण्याच्या ठिकाणी जाताना सतर्क राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर पुरामध्ये किंवा धबधब्यामध्ये वाहून गेलेल्या अनेक लोकांचे धक्कादायक व्हिडीओ समोर येतात. हे व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही लहान मुले जीव धोक्यात टाकून रील बनवताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. (three children doing reel video risking their life) या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तीन चिमुकले दिसतील. हे तिन्ही मुले एका रांगेत पळताना दिसत आहे. पहिल्या मुलाने हातात सेल्फी स्टिक धरली आहे तर बाकी दोन मुले त्या सेल्फी स्टिककडे म्हणजेच व्हिडीओकडे पाहत धावताना दिसत आहे. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की अचानक त्यांच्या मागे चिखल, गाळ माती ओसंडून वाहत पूर येतो. या लहान मुलांना हा पूर दिसतो तरीसुद्धा ते रीलच्या नादात मजा मस्ती करत पळतात. हेही वाचा : “ही खरी महाराष्ट्राची संस्कृती!”, वयाची पर्वा न करता मावशींनी सादर केली अफलातून लावणी, स्वच्छता कर्मचारी महिलेचा Video चर्चेत फक्त एका रीलसाठी आयुष्याशी खेळताना दिसतात. जेव्हा लाट अगदी जवळ येते तेव्हा दोन मुले उंचीवर चढतात पण शेवटचा मुलगा जेव्हा चढतो तेव्हा जोरात लाट येते पण सुदैवाने हा थोडक्यात वाचतो. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ हेही वाचा : “मी सीट का देऊ…” रेल्वेत पुरुषाने फटकारल्यावर बसू न देण्यावरून महिलेकडून गदारोळ; VIDEO पाहून लोकांनी कुणाला सुनावले? junagadh_wildlife_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "व्हिडीओ बनवण्याच्या नादात जीव गेला असता" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "थोडक्यात वाचले" तर एका युजरने लिहिलेय, "अशा व्हिडीओच्या नादात जीव जातो" आणखी एका युजरने लिहिलेय, "मृत्यूला स्पर्श करून आले हे तिन्ही मुले" अनेक युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी या लहान मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर टीका केली आहे. यापूर्वी असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही घटनांमध्ये अनेकदा रीलच्या नादात लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पूर, धबधब्याच्या ठिकाणी रील बनवण्याच्या नादात लोकांनी आपला जीव धोक्यात टाकू नये आणि सतर्क राहावे.