Viral Video : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. शिक्षण नोकरी व्यवसायासाठी दर दिवशी हजारो लोक मुंबईत येतात. मुंबई ही कायम गजबजलेली असते. तिथे लोकल असो किंवा रस्ते लोकांची कायम गर्दी असते. लोक अतिशय धावपळीत असतात. ही मरणाची गर्दी पाहून मुंबई बाहेरच्या लोकांना धक्का बसेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईची तुलना नागपूरबरोबर केली आहे आणि मुंबईपेक्षा नागपूर कसे कितीतरी पटीने चांगले आहे, याविषयी सांगितले आहे.
नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहराचा आता हळू हळू विकास होत आहे. मुंबईत तुफान गर्दी आणि धकाधकीचे जीवन आहे तर नागपूरमध्ये खूप शांतता व निवांत जीवन आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला ही गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला मुंबईची लोकल ट्रेन दिसेल. या लोकल ट्रेनमध्ये लोक चढताना आणि उतरताना दिसत आहे. ही भयानक गर्दी पाहून कोणीही अवाक् होईल. त्यानंतर पुढे व्हिडीओत नागपूरचे दृश्य दिसेल. शहरातील रस्त्यावर शांतता दिसत आहे. लोक निवांत दिसत आहे. मुंबई आणि नागपूरच्या या दोन्ही दृश्यांमध्ये विरोधाभास दिसतोय. हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल नागपूरच बरे! सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

pune metro
पुणेकरांचा नादखुळा! पुणे मेट्रोतून प्रवास करताना तरुणांनी केले असे काही, Viral Video पाहून पोटधरून हसाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Uber driver offer different facilities
‘फ्लाइटपेक्षा उत्तम…’ कॅबमध्ये खाण्यापिण्याची सोय पाहून प्रवासी झाला खूश; PHOTO शेअर करीत म्हणाला…
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
a place in maharashtra showcasing on a 20 rupees
Video : २० रुपयांच्या नोटेवर आहे महाराष्ट्रातील या लोकप्रिय ठिकाणाचे चित्र; तरुणाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
MTV republic day ad goes viral on asking important question of little boy and mother
“भारत देश इतका चांगला, मग ताईला…”, चिमुकल्याच्या प्रश्नावर आईचं उत्तर एकदा ऐकाच! प्रजासत्ताक दिनाच्या ‘या’ जाहिरातीने जिंकलं लोकांचं मन
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
china news highway house viral video
कष्टाने बांधलेल्या घरासाठी धुडकावली कोट्यावधींची ऑफर; सरकारला बदलावी लागली महामार्गाची रचना; पाहा Video

हेही वाचा : PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”

nagpur_beats या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “हे असं जगण्यापेक्षा आपलं नागपूरचं चांगलं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नागपूर सारखे शहर नाही कुठे” तर एका युजरने लिहिलेय, “नागपूर सर्वोत्तम शहर आहे. मेट्रोसिटीमध्ये साधं जगणं” आणखी एका युजरने लिहिलेय, “हिम्मत लागते मुंबईमध्ये राहायला आणि ती हिम्मत मुंबईकरांमध्ये आहे” एक युजर लिहितो, “नागपूर चांगले आहे पण नोकरीची संधी नाही, मोठी पगारवाढ नाही फक्त शांततेत आयुष्य चालत नाही” अनेक युजर्सनी नागपूरचे कौतुक केले आहेत तर काही युजर्सनी मुंबईचे सुद्धा महत्त्व सांगितले आहे.

Story img Loader