आपल्यापैकी बरेच जण मोबाईल चार्जिंगला लावून वापरतात. बेडवर पडून वापरत मोबाईल चार्जिंगला लावणारे अनेक जण आहेत. अनेकवेळा लोकांच्या चार्जिंग पिनच्या केबलचे प्लास्टिक बाहेर येते, त्यानंतरही ते चार्जर वापरत राहतात. मोबाईल हा आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामुळे आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तुम्हीही असे करत असाल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर काही विचित्र फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. तुटलेल्या वायरच्या चार्जरने मोबाईल चार्ज करण्याच्या सवयीमुळे किती नुकसान होऊ शकते, हे फोटोमधून दिसून येते. विशेषतः जेव्हा तुम्ही बेडवर झोपून तुमचा मोबाईल वापरत असता. ऑस्ट्रेलियाच्या अग्निशमन विभागाने फेसबुकवर हे फोटो शेअर केले आहेत.

(हे ही वाचा: Viral News: पोटातला गॅस विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय)

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

मोबाईलची चार्जिंग केबल पांढऱ्या रंगाच्या बेडवर पडल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. जो बर्‍यापैकी जळालेला दिसत आहे. बेडशीट आणि बेडवर पडलेली चादर दोन्ही चार्जिंग केबलने जळाल्याचे दिसून येत आहे. कल्पना करा जर चार्जिंग केबलमुळे या कपड्याव्यतिरिक्त शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाली असती तर त्या व्यक्तीची काय अवस्था झाली असती? या चार्जर जळल्यामुळे केबलचे प्रोटेक्टिंग कोटिंग निघाले होते. त्यामुळे बेडशीट आणि चादर या दोन्हीवर जाळल्याच्या खुणा होत्या.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

(हे ही वाचा: “गडपती,गजअश्वपती,भूपती…” चिमुरडीच्या शिवगर्जनेचा अंगावर काटा आणणारा Video Viral)

फोटो व्हायरल

हे फोटो शेअर करताना ऑस्ट्रेलियाच्या अग्निशमन विभागाने लिहिले की, ‘तुमच्या मुलांनाही ख्रिसमससाठी टॅबलेट किंवा फोन दिला आहे?.’ त्यात पुढे लिहिले आहे की, ‘तुमची मुले अंथरुणावर झोपताना कधीही मोबाईल चार्जर वापरणार नाहीत याची तुम्ही खात्री केली पाहिजे. तुमच्या मुलांना याचे पालन करायला शिकवा. मोबाईल चार्जिंगसाठी सपाट पृष्ठभाग निवडा. अशा ठिकाणी कोणतेही ज्वलनशील पदार्थ नसावेत. स्वस्त सामग्री वापरणे टाळा.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you also have a habit of using mobile while charging so know this incident ttg
First published on: 05-01-2022 at 17:25 IST