Viral Video : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळे अन्नपदार्थ खायला मिळतात. प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे. अशात सोशल मीडियावर अनेक नवनवीन पदार्थ पाहायला मिळतात. काही पदार्थांचे नाव ऐकून कोणीही थक्क होऊ शकतो. सध्या अशाच एका पदार्थाची जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही कधी ‘पिटाई पराठा’ खाल्ला का? हो, ‘पिटाई पराठा. आजवर तुम्ही इतके पराठे खाल्ले असेल पण ‘पिटाई पराठा’हे नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकले असेल. ‘पिटाई पराठा’नेमका आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.
व्हायरल व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ कोलकाता येथील आहे. या व्हिडीओत तुम्हाला एक पराठा विक्रेता दिसेल. तो ‘पिटाई पराठा’ बनवताना दिसत आहे. या पदार्थाला ‘पिटाई पराठा’ का म्हणतात, हे तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की विक्रेता सुरुवातीला पराठा बनवतो आणि त्यानंतर त्या पराठ्याला इतका आपटतो की तुम्हीही अवाक् व्हाल. आपटल्यामुळे पराठ्याचे तुकडे तुकडे होताना दिसत आहे. त्यानंतर पराठ्याचे तुकडे एका प्लेटमध्ये ठेवतो आणि ग्राहकांना सर्व्ह करतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् व्हाल. काही लोकं हा आगळा वेगळा पराठा पाहून आश्चर्यचकीत होतील.
सोशल मीडियावर असे अनेक विचित्र पदार्थांचे व्हिडीओ समोर येतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘बार्बी पिंक बिर्याणी’चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले होते.
.foodie_insaan. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोलकत्ता येथील पिटाई पराठा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “हा विक्रेता ९९.९ टक्के बॅक्टेरीया मारतो” तर एका युजरने लिहिलेय, “ऑर्डर करणारा ही पद्धत पाहून दुरून पळणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “बिचारा पराठा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. अनेकांनी पराठ्याचा हा विचित्र प्रकार पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.