Viral Video : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळी भाषा, वेशभूषा आणि खाद्यसंस्कृती दिसून येते पण काही पदार्थ असे आहेत जे संपूर्ण देशात आवडीने खाल्ले जातात. जसे की समोसा. समोसा हिरव्या चटणीबरोबर चवीला अप्रतिम वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण देशात लोकप्रिय स्नॅक म्हणून समोसा ओळखला जातो पण तुम्ही कधी ममोसा खाल्ला आहे का? तुम्हाला वाटेल, हा कोणता पदार्थ आहे? तर जाणून घ्या. ममोसा हा समोसा आणि मंच्युरियन यापासून बनवलेला पदार्थ आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा खास पदार्थ नेमका कुठे मिळतो? तर त्यासाठी तुम्हाला एक व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये एक व्यक्ती समोश्याबरोबर मंच्युरियन सर्व्ह करताना दिसत आहे.

हेही वाचा : याला म्हणतात खरं टॅलेंट! तीन वर्षाच्या चिमुकलीची बॅटिंग एकदा पाहाच, क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ स्ट्रिट फूड विकणाऱ्या एका विक्रेत्याचा आहे. या व्हिडीओत तुम्हाला एक विक्रेता दिसेल जो मंच्युरियन समोसा विकताना दिसतोय. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे सुरूवातीला विक्रेता एका प्लेटमध्ये समोसा ठेवतो आणि त्याला हाताने दाबतो त्यानंतर त्यावर ग्रेवीसह मंच्युरियन टाकतो. त्यावर पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी सुद्धा टाकतो आणि त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकतो आणि सर्व्ह करतो. अशाप्रकारे व्हिडीओत हा मंच्युरियन समोसा कसा बनवला जातो, हे तुम्हाला दिसेन. मंच्युरियन समोसा विकणाऱ्या या व्यक्तीच्या मते, हा पदार्थ आपल्याला कुठेही खायला मिळणार नाही. व्हिडीओत पुढे हा विक्रेता या खास पदार्थाची किंमत सांगतो. फक्त २० रूपयांमध्ये विक्रेता मंच्युरियन समोसा विकतो.

officialsahihai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मंच्युरियन + समोसा = ममोसा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे विष आहे” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “थोडे गुलाबजामून पण टाका” आणखी एका युजरने लिहिलेय, “माफ करा पण तुम्ही समोसा खराब केला” अनेक युजर्सना हा पदार्थ आवडला नाही. काही युजर्सनी तर संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you ever eat manchurian samosa the vendor selling samosas with manchurian video goes viral on social media netizens reacted ndj
First published on: 20-02-2024 at 16:51 IST